शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरातील 'त्या' अनोळखी तरुणीची दगडाने ठेचून हत्याच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:14 IST

पीएम रिपोर्टमधून उकल : संशयिताला अटक, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती/बडनेरा : मंगळवारी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीला हेड इंज्युरी आढळून आली. त्यातून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची बाब शवविच्छेदन अहवालावरून समोर आली आहे. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी १७ ऑक्टोबर पहाटे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान मृत तरुणीची ओळख अद्यापही पटली नसून त्यादृष्टीने बडनेरा पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

बडनेरा पोलिसांनुसार, शेखर ऊर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर (३४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बडनेरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरील जुन्या वस्तीच्या बाजूने तिकीट घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ १५ ऑक्टोबर रोजी सकाळी एका तरुणीचा मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळून आला होता. पंचनाम्यादरम्यान बडनेरा पोलिसांना मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या होत्या. तसेच तेथे रक्ताचे डागसुद्धा दिसून आले होते. मृत तरुणी ही अनोळखी असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना नुकताच प्राप्त झाला. हेड इंज्युरीमुळे मृत्यू झाल्याचे त्यात नमूद असल्याने तरुणीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तो अहवाल व साहू यांच्या बयानानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रत्यक्षदर्शीच बयाण ठरले पूरक बडनेरा पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील पाणी बॉटल विक्रेता राजकुमार सुदर्शन साहू (३०, रा. साहू बाग, अमरावती) यांचे बयाण नोंदविले. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास आपण पाण्याच्या टाकीजवळ झोपलो होतो. अचानक मला भांडणाचा आवाज आला. उठून बघितले असता, एक अनोळखी महिला व दोन पुरुष खूप दारू पिऊन नशेत भांडण करीत होते. त्या दोघांपैकी एक शेखर होता. ते दोघे त्या महिलेला लाथाबुक्क्या व दगडांनी मारहाण करीत होते. दारूच्या नशेत असल्यामुळे आपण तेथून निघून गेलो, असे साहू यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती