शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

गुंडाचा पाठलाग करताना ठाणेदाराने रोखली पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:18 PM

एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाºयालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाºया तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला.

ठळक मुद्देमहाजनपुऱ्यातील थरार : अखेर ‘तो’ जेरबंद, पुंडलिक मेश्राम यांचे शौर्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाऱ्यालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाऱ्या तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला. त्याचा ठाणेदार व पोलीस हवालदार गल्लीबोळातून पाठलाग करीत होते. ठाणेदारांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखून त्या तरुणाला थांबण्यास सांगितले. त्यानंतरही सैरावैरा पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अखेर दोनशे ते तीनशे मीटर अंतरापर्यंत पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुरा येथे शनिवारी दुपारी १.४५ च्या सुमारास नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिला. आरोपी तरुणाचा पाठलाग करणारे खोलापुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम होते. मलकापूर (ता. भातकुली) येथील एक तरुण शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात धडपडत पोहोचला. ठाणेदार मेश्राम त्यावेळी खुर्चीवर आसनस्थ होते. महाजनपुरा परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एक तरुण मोठा चाकू हाती घेऊन नागरिकांना धमक्या देत लुटपाट करीत आहे. मलासुद्धा त्याने चाकू दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, असे त्या तरुणाने ठाणेदाराला सांगितले. हा प्रकार ऐकून ठाणेदारांनी खुर्ची सोडली आणि त्या व्यक्तीला दुचाकीवर बसविले. हवालदार हरीश भुजाडे यांनाही सोबत घेतले.गल्लीबोळातून ठाणेदार मेश्राम व भुजाडे महाजनपुºयात पोहोचले. पोलिसांना पाहून त्या तरुणाने गल्लीबोळातून धूम ठोकली. दरम्यान, पाठलागावर असलेले ठाणेदार मेश्राम यांनी पिस्टल त्या तरुणाकडे रोखली. मात्र, तो पळतच सुटला होता. अखेर त्यांनी त्या तरुणाला घेराव घालून ताब्यात घेतले. पोलीस व्हॅन बोलावून त्याला ठाण्यात नेले. ठाणेदारांनी तात्काळ दखल घेत स्वत:च धावपळ करून चाकू दाखविणाºया तरुणाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्याची पहिलीच घटना शहरात असावी, असे दिसून येत आहे. हा प्रकार बघून नागरिकांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आॅटोरिक्षाच्या काचा फोडून लुटले पाचशे रुपयेआकाश बारीलाल सोळंके (२२, रा.गोपालनगर) हा एमएच २७ बीडब्ल्यू ३११४ क्रमांकाच्या आॅटोरिक्षाने प्रवासी घेऊन दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून खोलापुरी गेटकडे जात होता. महाजनपुरा परिसरात मद्यपीने आॅटोरिक्षा थांबविली. त्याने आकाशच्या गळ्याला चाकू लावून खिशातील पैसे काढले. आॅटोरिक्षाच्या काचा दगडाने फोडल्या. या गोंधळानंतर आकाशने खोलापुरी गेट ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.अल्पवयीनाविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हेखोलापुरी गेट हद्दीतील हा १७ वर्षीय अल्पवयीन अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा आहे. याशिवाय अन्य काही गुन्ह्यांमध्ये त्या अल्पवयीनाचा समावेश आहे. तो नुकताच बाल निरीक्षणगृहातून बाहेर आला. अल्पवयीन असल्याचा फायदा उचलून तो गुन्हेगारी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.