शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भावी शिक्षकांची अभियोग्यता १२ डिसेंबरपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 8:29 PM

अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत राज्यभरातून २ लाख ३३ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाकडून घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा १२ ते २१ डिसेंबरदरम्यान आॅनलाइन होणार आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचे नियोजन शासनाने केले असले तरी शिक्षक भरतीसाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत, याची शासनाने आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता किती भरली जाणार याकडेही भावी शिक्षकांचे लक्ष लागले आहे. अशी होणार भरतीया भरतीसाठी शासनाने अद्ययावत पद्धत वापरली आहे. शिक्षणसेवक व शिक्षक भरतीसाठी सरल पोर्टलद्वारे असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना मान्यताच मिळणार नाही. तसेच रिक्त जागांची माहिती मिळताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाणार आहे. बिंदूनामावलीसाठी 'पवित्र' हे पोर्टल सुरू केले आहे. पद भरतीची जाहिरात या पोर्टलवर द्यावी लागणार आहे. सदर जाहिरात १५ दिवस राहणार असून दोन वर्तमानपत्रातून प्रकाशित करावी लागणार आहे. 

काय आहे अभियोग्यता चाचणी?वस्तुनिष्ठ २०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यात परीक्षार्थीला पाच वेळा संधी मिळणार आहे. मराठी व इंग्रजी हे निवड विषय माध्यम भरतीवर नियंत्रण आणल्यामुळे यापुढे आता संस्था चालकास नात्यागोत्यातील किंवा मर्जीतील शिक्षक घेता येणार नाहीत.

टॅग्स :Teacherशिक्षक