शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:31 IST

एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांवरही जबाबदारी : माध्यान्ह भोजनाची साहित्य खरेदी करावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे. विद्यार्थ्याना माध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम मुख्याध्यापक, शिक्षकांना करावे लागणार आहे.माध्यान्ह भोजनासाठीचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराची अद्याप निवडच केली नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर शाळा स्तरावर मिळालेल्या निधीतून साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आदेश आहेत. येत्या काही दिवसांत मुख्याध्याकांसह शिक्षक हातात पिशव्या घेऊन बाजारात दिसले तर यात काही नवल वाटू नये, जनगणना, निवडणूक आयोगाची कामे, विविध शासकीय सर्वेक्षणाबरोबरच आता माध्यान्ह भोजनासाठी लागणारे साहित्यही शिक्षकांनाच गोळा करावे लागणार आहेत.राज्यातील शाळांमधील मुलांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी काढण्यात येणारी निविदा प्रक्रिया एप्रिल ते मे दरम्यान पूर्ण होऊन ठेकेदारांमार्फत आहार पुरवठा होतो. ती आजपर्यतची प्रक्रिया होती. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे माध्यान्ह भोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.निविदा काढून पोषण आहाराचे साहित्य पुरविण्याचे काम कंत्राटदारामार्फत करून घेण्यात येते. या कंत्राटदारामार्फतच राज्यातील ८० हजार शाळांना साहीत्य पुरवठा केला जातो. मात्र शासनाकडृून कंत्राटदारच निवडला न गेल्यामुळे शाळांना साहित्य पुरवठा बंद झाला आहे. यामुळे अनेक शाळांमधील साहित्य संपला असून माध्यान्ह भोजनासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शाळेत दिल्या जाणाºया निधीतून मुख्याध्यापकांनी साहित्य खरेदी करून माध्यान्ह भोजन देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशैक्षणिक कामात भर पडली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याच्या वेळात खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.शिक्षकांनी ज्ञानार्जन करावे की बाजारात पिशव्या घेऊन फिरायचे हा प्रश्न पडला आहे. दुकानदार उधार किती दिवस देतील. शासनाच्या या निर्णयामुळे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची शक्यता वाढीस लागली आहे.- राजेश सावरकर,मुख्याध्यापकशिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्याने अध्यापनासाठी वेळ मिळत नाही. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांना केवळ अध्यापनाचेच काम दिले जावे, माध्यान्ह भोजनासाठी शासनाने स्वतंत्र्य यंत्रणा उभारावी.- किरण पाटील, सरचिटणीसप्राथमिक शिक्षक संघ