शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती

By admin | Updated: December 9, 2015 00:16 IST

नगराध्यक्षाच्या होऊ घातलेल्या ११ तारखेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असून याप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे.

स्थिती कायम : नागपूर खंडपीठाचा निर्णयमोर्शी : नगराध्यक्षाच्या होऊ घातलेल्या ११ तारखेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असून याप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतिभा कटीस्कर यांना नगर विकास राज्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे पदावरुन कमी केले. पुढील सहा वर्षापर्यंत त्यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीला प्रतिबंध घातला होता. शासनादेश प्राप्त झाल्यावर नगराध्यक्षा प्रतिभा कटीस्कर पायउतार झाल्यात. त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार तहसीलदार अनिरुध्द बक्षी यांनी स्वीकारला. इकडे सत्तारुढ गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे राज्यमंत्र्याच्या आदेशाविरुध्द याचिका दाखल करुन आदेश रद्द ठरविण्याची विनंती केली होती. याप्रकरणी १४ डिसेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निर्धारित करण्यात आलेली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्षाच्या रिक्तजागेसाठी निवडणूक जाहीर केली. तशा सूचना नगर सेवकांना दिल्या होत्या. हे पाहता सत्तारुढ गटाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे दाखल याचिके प्रकरणी तातडीची सुनावणी करण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर ला या प्रकरणी सुनावणी ठेवली होती. याचिकाकर्त्या प्रतिभा कटीस्कर यांच्या वतीने एम व्ही. समर्थ, शासनाच्यावतीने भारती डांगरे यांनी तर नगरसेविका वंदना बोरकर यांच्यावतीने एस. एम. वैष्णव यांनी बाजू मांडली. शासनाचे वकील भारती डांगरे यांनी ८ डिसेंबरपर्यंत शासनाची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला.