मोर्शी पंचायत समितीमधील दोन कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: December 22, 2014 22:38 IST2014-12-22T22:38:06+5:302014-12-22T22:38:06+5:30
मोर्शी पंचायत समितीमध्ये कार्यरत एका सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या नावाने बनावट प्रस्ताव तयार करून रजा रोखीकरणाची देयके काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील पंचायत समितीचे

मोर्शी पंचायत समितीमधील दोन कर्मचारी निलंबित
अमरावती : मोर्शी पंचायत समितीमध्ये कार्यरत एका सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या नावाने बनावट प्रस्ताव तयार करून रजा रोखीकरणाची देयके काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी एस.बी.शहा व कनिष्ठ लिपिक हेमराज भटकर या दोन कर्मचाऱ्यांना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे जि.प.वर्तुळात खळबळ उडाली आहे.
स्थानिक पंचायत समितीत अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा विश्वासराव काळे ३१ जुलै २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. शासन धोरणानुसार तीनशे दिवसांच्या रजा रोखीकरण प्रस्तावानुसार तत्कालिन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोमवंशी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशपत्राच्या आधारावर जानेवारी २०१४ मध्ये सुमारे ३ लाख ३२ हजार रूपयांचे देयक काढण्यात आले होते. मात्र, काळे गतवर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या सेवापुस्तीकेत याबाबत नोंद घेणे आवश्यक होते. ती नोंदच पंचायत समितीच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. त्यानंतर पुन्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा काळे या ३१ जुलै २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०१४ रोजी सध्याचे प्रभारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्या बनावट स्वाक्षरीच्या आदेशाच्या आधारावर काळे यांच्या नावाने रजा रोखीकरणाच्या देयकाचा बनावट प्रस्ताव तयार करण्यात आला व तो पुन्हा मंजुरीसाठी गटविकास अधिकारी दिलीप मानकर यांचेकडे सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावावर मानकर यांना संशय आल्यामुळे त्यांनी हा प्रकार मुख्य कार्यकारी अनिल भंडारी यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत सीईओ भंडारी यांनी चौकशी करून दोषी सहायक लेखाधिकारी शहा व कनिष्ठ लिपिक भटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.