मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 00:07 IST2021-04-29T00:05:38+5:302021-04-29T00:07:01+5:30
रेड्डी याला ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रीतसर परवानगी घेतली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी पोलिसांच्या ताब्यात
अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अमरावती ग्रामीण क्राईम ब्रँचने बुधवारी उशिरा रात्री नागपूरहुन ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. अमरावती ग्रामीण पोलिस याबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगून आहेत.
रेड्डी याला ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर बुधवारी नागपूर शहर पोलिसांच्या मदतीने रेड्डीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रेड्डी यांच्या मुलाला तसे पत्रही दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. याप्रकरणी अमरावतीच्या तपास अधिकारी पुनम पाटील यांनी मीडियाला माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.