शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची बाथरूममधील छायाचित्रे काढल्याचा संशय; ‘रूमबॉय’ला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:19 IST

महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूमचा फायदा घेत महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतल्याच्या संशयावरून राजापेठ पोलिसांनी हॉटेलच्या एका रूमबॉयला रविवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पंकज नारायण खडसे (१९, रा.वडाळी) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देहॉटेल इम्पेरियामधील घटना : राजापेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूमचा फायदा घेत महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतल्याच्या संशयावरून राजापेठ पोलिसांनी हॉटेलच्या एका रूमबॉयला रविवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पंकज नारायण खडसे (१९, रा.वडाळी) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.इलेक्ट्रॉनिक्स मीडियाशी जुळलेल्या उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील इंद्रपूरम् येथील महिलेने रविवारी राजापेठ पोलिसांत या घटनेविषयी तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, काही सहकारी कर्मचाऱ्यांसोबत हॉटेल इम्पेरिया येथे थांबलेली महिला हॉटेलच्या खोलीचे दार उघडे ठेऊन लॅपटॉपवर काही काम करीत असताना, एक तरुण अकारण खोलीसमोरून चकरा घालत होता. इतर खोल्यांची दारे बंद असल्यामुळे हॉटेलच्या पॅसेजमध्ये शुकशुकाट होता. महिलेने आरडाओरड केल्याने तिचे सहकारी खोल्यांमधून बाहेर निघाले. यादरम्यान त्यांनी हॉटेलच्या खालच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, हॉलमध्ये सुरु असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नागरिकांनी एका तरुणास पकडून ठेवले होते. महिलेने त्या तरुणाला पाहिले. त्यांच्या खोलीसमोर चकरा घालणारा तोच तरुण असल्याचे निदर्शनास आले. दिलीप गायगोले नामक व्यक्तीने पंकज खडसेला पकडून ठेवले होते.पंकज खडसेने हॉलमधील महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूममधून लपून-छपून महिलांची छायाचित्रे काढली असावी, असा संशय तक्रारकर्त्या महिलेने राजापेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी पकंज खडसेविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (क) अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला अटक करण्यात आली आहे.स्मार्ट फोन फॉरमेट करण्याचे कारण काय?रविवारी रात्री हॉटेल इम्पेरियात ही घटना घडल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांना दिलीप गायगोले नामक व्यक्तीने आरोपीचा मोबाइल सोमवारी आणून दिला. त्यावेळी तो स्मार्ट फोन फॉरमेट करण्यात आला होता. आरोपीचा स्मार्ट फोन फॉरमेट का करण्यात आला, त्यात महिलांची अश्लील छायाचित्रे होती की नाही, ही बाब पोलिसांसाठी महत्त्वाची होती. तो स्मार्ट फोन महत्त्वाचा पुरावा असताना पोलिसांनीही तो फॉरमेट का केला, याविषयी चौकशी केली नाही. त्या स्मार्ट फोनमधील डेटा रिकव्हर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.पीडित महिलेचा तक्रारीस नकारबाथरूममधील महिलांचे छायाचित्र काढण्याचा प्रकार पुढे येताच नागरिकांनी पंकज खडसेला पकडले होते. मात्र, ज्या महिलेबाबत हा प्रकार घडला, तिने तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान हॉटेलमध्ये थांबलेल्या व मीडियाशी जुळलेल्या एका महिलेने पुढाकार घेऊन राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली.महिलेला लज्जा उत्पन्न झाल्यामुळे तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. महिलांचे फोटो काढल्याचा संशय तक्रारीतून व्यक्त केला आहे.- शशिकांत सातवपोलीस उपायुक्त