शहरातील ७३ बेघरांना ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:58+5:30
जिल्ह्यात संचारबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावाच्या, बेघर असलेल्यांना कुठेच आश्रय नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना मूळ गावी जाता येत नाही. अशा उघड्यावरील बेघरांना कोरोना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील चमूने शोधून आधारमध्ये आणले.

शहरातील ७३ बेघरांना ‘आधार’
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : शहरातील ७३ बेघरांना महापालिका प्रशासनाने ‘आधार’ दिला. कोरोना विषाणूचे संकट पाहता, गत आठ दिवसांपासून बेघरांचा शोध घेत त्यांना बडनेरा येथील राष्ट्रीय नागरी उपजिविका अंतर्गत आधार शहरी केंद्रात आश्रय देण्यात येत आहे.
जिल्ह्यात संचारबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावाच्या, बेघर असलेल्यांना कुठेच आश्रय नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना मूळ गावी जाता येत नाही. अशा उघड्यावरील बेघरांना कोरोना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील चमूने शोधून आधारमध्ये आणले. आठ दिवसांत ४० बेघरांना आश्रय देण्यात आला आहे. बेघरांच्या सहकार्यासाठी चार सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. महापालिकेने थर्मल तपासणी, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.
अकोला येथे १२ जणांना पाठविले
लॉकडाऊनमुळे अमरावतीत अडकलेल्या अकोला येथील १२ जणांना महापालिका प्रशासनाने अॅम्ब्यूलन्सद्वारे बुधवारी त्यांच्या मूळ गावी पोहचविले. या केंद्रात ३२ बेघर नागरिक पूर्वीचे आहेत. वाशिम, नागपूर, वर्धा येथील काही नागरिक संचारबंदीच्या काळात आणले आहेत.