शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

इर्विनमध्ये कालबाह्य औषधांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 1:33 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच जिल्ह्यांतील सामान्य रुग्ण औषधोपचाराकरिता येतात. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चक्क कालबाह्य झालेले औषध बाळांना दिला जात असल्याचा गौप्यस्फोट शनिवारी खासदार नवनीत राणा यांच्या पाहणीदरम्यान झाला.

ठळक मुद्देखासदारांच्या भेटीने गौप्यस्फोट । जिल्हा शल्यचिकित्सकांना फुटला घाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच जिल्ह्यांतील सामान्य रुग्ण औषधोपचाराकरिता येतात. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चक्क कालबाह्य झालेले औषध बाळांना दिला जात असल्याचा गौप्यस्फोट शनिवारी खासदार नवनीत राणा यांच्या पाहणीदरम्यान झाला. या प्रकाराने जिल्हा शल्यचिकित्सकांना घाम फोडला असून, संबंधित डॉक्टरला समज देण्यात आली.अमरावती हे विभागीय शहर असून, पाच जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्ण येथे आशेने उपचार घेण्याकरिता येतात. रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असताना तेथील असुविधांचादेखील रुग्णांना सामना करावा लागत आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल खासदार नवनीत राणा यांनी दुपारी १ वाजताच्या सुमारास रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांचे नातेवाईकांनी विचारणा केल्यास मनुष्यबळाचा अभाव त्यांच्या लक्षात आणून दिला जातो. मात्र, वरिष्ठ अधिकारी त्यावर ठोस तोडगा काढण्यास तयार नसल्याचे शनिवारच्या खासदारांच्या भेटीतून उघड झाले. खा. नवनीत राणा यांनी दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. प्रथम अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल रुग्णांची आस्थाने विचारपूस करण्यात आली. तेथील अद्ययावत उपकरणे सीटी स्कॅनिंग, एक्स-रे, सोनोग्राफी आदींची पाहणी केली. बाळांच्या वार्डात जाऊन नातेवाईकांना विचारणा केली. बाळांना रक्तवाढण्याकरिता दिले जाणारेटोनोफेरॉन सायरपची अंतिम तारीख २ मे २०१९ असतानाही त्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार बघून खा. राणा यांचा पाराच भडकला. त्यांनी सीएससह तेथील कार्यरत डॉ. पवार यांचा खरपूस समाचार घेतला. यापुढे असा प्रकार घडू नये, अन्यथा कारवाईचे आदेश देऊ, असे ठणकावले. यावेळी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.अस्वच्छतेच्या मुद्यावर भडकल्या नवनीत राणाप्रसाधनगृहाकडे वळताच सफाई कामगाराने पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले, तसेच नाल्यात कचरा तुंबल्याने दुर्गंधी पसरलेली दिसताच खा. नवनीत राणा चांगल्याच भडकल्यात. येथे बालकांवर उपचार होत असताना अस्वच्छतेकडे एवढे दुर्लक्ष कसे करू शकता, असा सवाल त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केला. एकाही रुग्णांची गैरसोय खपवून घेणार नाही, असे बजावले.डफरीनला वारेंनी सोडले वाऱ्यावरजिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांचा ताफा जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे वळला. तेथे पोहचताच वैद्यकीय अधीक्षक संजय वारे अनुपस्थित आढळून येताच 'डफरीनला वारेंनी सोडले वाºयावर' असे उद्गार खा. नवनीत राणा यांनी काढला.जळीत वार्डात मुलीला वाढदिवसाची भेटजळीत वार्डातील लेडीज कक्षेत उपचारार्थ दाखल असलेली नुकतीच इयत्ता दहावीत प्रवेशित झालेली अमिशा धनराज भुरभुरे (रा. टाकरखेडा लहानुजी महाराज)हिच्या पायावर उकळते चहा सांडल्याने उजवा पाय भाजले. आज तिचा वाढदिवस असल्याचे तिच्या वडिलांनी सांगताच खासदार नवनीत राणा यांनी दोन हजार रुपयांसह गळाभेटीने तिचा रुग्णालयातच वाढदिवस साजरा केला.रुग्णालयात अद्ययावत सुविधा पुरविण्यासाठी व इतर कामे करवून घेण्यासंदर्भात शासनाला परवानगी मागितली आहे. काही प्रमाणात कामे झाली असून, काही कामे सुरू आहेत.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटल