सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:54+5:302021-06-20T04:09:54+5:30

वरूड : शेतीच्या वादातून सुरळी येथे सचिन सोनारे (४७) यांना मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी ही घटना ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

वरूड : शेतीच्या वादातून सुरळी येथे सचिन सोनारे (४७) यांना मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कैलाश साबळे, नंदकिशोर साबळे (मधुबन कॉलनी, वरूड) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

टेंभूरखेडा येथे इसमाला मारहाण

वरूड : तालुक्यातील टेंभुरखेडा येथे गुणवंत कुबडे यांना मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश ठाकरे (३५, टेंभूरखेडा) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

पुसला येथे महिलेला मारहाण

पुसला : येथील एका ३६ वर्षीय महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपी मारोती सरियाम (३२, रा. पुसला) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

बिजुधावडी येथे शेतकऱ्याला मारहाण

धारणी : तालुक्यातील बिजुधावडी येथील शालिकराम भिलावेकर (४५) यांना मारहाण करण्यात आली. १६ जून रोजी सायंकाळी पैसे मागण्याच्या कारणावरून हा वाद झाला. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शाम भिलावेकर (४०, बिजुधावडी) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

लेहगाव येथे मारहाण

दर्यापूर : तालुक्यातील लेहगाव येथे ज्ञानेश्वर चापके (५५) यांना मारहाण करण्यात आली. तथा मध्यस्थी करणाऱ्या महिलेला देखील मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी हा प्रकार घडला. दर्यापूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कपिल तोमर, नटवर तोमर, दीपक चिंधे व अन्य एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

लेहगाव गाजीपुरात महिलेसह दोघांना मारहाण

येवदा : लगतच्या खुर्चनपूर येथील एका ६० वर्षीय महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपी धीरज चापके (गाजीपूर) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------

तळणी रेल्वे गेट परिसरातून दुचाकी लंपास

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील तळणी रेल्वे गेट परिसरातून एमएच २७ सीके २९३९ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी १७ जून रोजी गुन्हा नोंदविला.

-----------------

माळेगाव शिवारातून लोखंडी अँगल लंपास

माहुली : माळेगाव शिवारातून अजय उमक यांचेजवळ देखरेखीकरिता असलेल्या शिवारातून १ लाख २० हजार रुपये किमतीचे ४०० अँगल चोरीला गेले. १७ जून रोजी रात्री ही घटना घडली. माहुली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

घाटलाडकी येथे मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : घाटलाडकी येथील सुभाष बिजवे, त्यांची पत्नी व मुलीला मारहाण करण्यात आली. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी प्रशांत बिजवे, विष्णुपंत बिजवे व दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

सोनोरी येथे मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : घरगुती कारणावरून विलास भीमराव खवले (३०, सोनोरी) यांना मारहाण करण्यात आली. १३ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी वैभाव प्रकाश गणोरकर (३०) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी जगदीप माणिकराव इंगळे (रा. चौसाळा) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

जनुना येथे तरुणाला मारहाण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जनुना येथे अर्जुन केवदे (२८) याच्या अंगठ्यावर सुरा मारण्यात आला. १६ जून रोजी दुपारी ही घटना घडली. लोणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रमोद केवदे (२२) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

तहसील परिसरातून दोन दुचाकी लांबविल्या

मोर्शी : येथील तहसील कार्यालय परिसरातून १० जून रोजी एमएच २७ एव्ही ५३५१ व एमएच २७ एके ४४८५ अशा दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या. तहसील कर्मचारी सुधीर शिरभाते (४९) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

महिलेवर अतिप्रसंग

वरूड : तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला. १६ जून रोजी दुपारी ही घटना घडली. वरूड पोलिसांनी आरोपी शेख शरिफ शेख जलिल (३५, आष्टी, वर्धा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील भातकुली येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संदीप तिरमारे (रा. रसुलाबाद, आर्वी) यांचा मृत्यू झाला. १५ जुन रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात घडला. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी एमएच १६ बीसी ७८६५ या ट्रकचा चालक आसिफ दाऊद शेख (३८, रा. केळगाव, अहमदनगर) याचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

धामणगाव रेल्वे येथून दुचाकी लंपास

धामणगाव रेल्वे : येथील एका परिसरातून एमएच २७ बीए ७५६२ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १६ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी सै. कय्युम (५२, सालोड) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

डेहणी येथे महिलेला मारहाण

तिवसा : तालुक्यातील डेहणी येथे एका महिलेला मारहाण करण्यात आली. सिलिंडरसाठी दिलेले पैसे दारूत खर्च केले, असे म्हटल्याने हा वाद झाला. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शाम पांडे (३४, डेहणी) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

पोलीस पाटलाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी

चिखलदरा : रात्री १० नंतरही सुरू असलेला डीजे बंद करा, अशी सूचना करण्यास गेलेल्या पोलीस पाटील रमेश महल्ले (४०) यांना मारहाण करण्यात आली. तथा शिवीगाळ करण्यात आली. १५ जून रोजी हा प्रकार घडला. चिखलदरा पोलिसांनी आरोपी सै. मन्नान, सै. सलमान (दोन्ही रा. गौरखेडा बाजार) व परवेज शेख (परतवाडा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------------

फोटो पी १९ भातकुली

भातकुली येथे रायुकाँचे निवेदन

भातकुली : वाढत्या महागाईला रोखण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस भातकुली तालुका व शहरच्यावतीने गुरुवारी भातकुली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी वैभव ठाकरे, प्रतीक खडसे, अस्तिक पारसे, जावेद शेख, सागर शिरसाट, राहुल वानखडे, सुमित जगदाळे, शाकीर अली, प्रणित काजळे, खोपे उपस्थित होते.

-------------

भातकुलीत रायुकाँची पत्रमोहिम

भातकुली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी' ही मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका अध्यक्ष अमोल भारसाकळे व शहर अध्यक्ष वैभव ठाकरे यांनी एक पत्र मराठा आरक्षणासाठी पाठविले. यावेळी प्रतिक खडसे, अस्तित्व पारसे, जावेद शेख, सागर शिरसाट, राहुल वानखडे, सुमित जगदाळे, शाकीर अली,

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.