सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:57+5:302021-06-16T04:16:57+5:30

वरूड : स्थानिक रिंगरोडवरील दवाखान्याच्या परिसरातील एका घराजवळ ठेवलेली एमएच ४९ एझेड ९८०६ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

वरूड : स्थानिक रिंगरोडवरील दवाखान्याच्या परिसरातील एका घराजवळ ठेवलेली एमएच ४९ एझेड ९८०६ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १० जून रोजी सायंकाळनंतर ही घटना घडली. वरूड पोलिसांनी मनीष साबळे (३३, पवनी संक्राजी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

वाडेगाव येथे महिलेला मारहाण

वरूड : तालुक्यातील वाडेगाव येथे एका ३४ वर्षीय विवाहितेला मारहाण करण्यात आली. १२ जून रोजी दुपारी ही घटना घडली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गजानन इंगोले (४३, वाडेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

कुंभीखेडा शिवारातून ताडपत्री लंपास

शेंदूरजनाघाट : वरूड तालुक्यातील कुंभीखेडा शिवारातून २० हजार रुपये किमतीची ताडपत्री लंपास करण्यात आली. ८ ते १० जून दरम्यान ही घटना घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत यावलकर यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

करजगावातून दुचाकी लांबविली

करजगाव : येथील गजानन नेवारी (२८, रा. फंटापुरा) यांची एमएच २७ एन १४८२ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेण्यात आली. याप्रकरणी शिरजगाव पोलिसांनी आरोपी अमरदीप राजेंद्र आगलावे (२५, रा. करजगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

केला. -------------

स्टेटस ठेवून विद्यार्थिनीचा विनयभंग

परतवाडा : एका मुलीचा फोटो स्टेटसवर ठेवून त्याखाली ‘माय लव्ह’ असे लिहून तिची बदनामी करण्यात आली. ११ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी रोशन अशोक काळे (२८, रा. एकलासपूर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल केला.

--------------------

एकता ज्वेलर्समधून १.६२ लाखांचे मंगळसूत्र लांबविले

परतवाडा : येथील एकता ज्वेलर्समधून १ जून रोजी ६२ हजार २५० रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविण्यात आले. ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात स्त्री-पुरुषाने ते लांबविल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले. ७ जून रोजी दुपारी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी प्रवीण डोफे यांच्या तक्रारीवरून १२ जुन रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

मार्डी स्मशानभूमी परिसरातून टँकर लंपास

कुऱ्हा/तिवसा: तालुक्यातील मार्डी येथील स्मशानभूमी परिसरातून ५० हजार रुपये किमतीचा टँकर लंपास करण्यात आला. १५ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी उमेश नाईक यांच्या तक्रारीवरून १२ जून रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

तळेगाव ठाकूर येथे मारहाण

तिवसा : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील पंकज हरणे (३२) याच्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ तसेच पंकज हरणे यास मारहाण करण्यात आली. घराच्या वादातून १२ जून रोजी ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी आरोपी प्रवीण हरणे (४०, रा. तळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

दत्तापुरात महिलेचा विनयभंग

धामणगाव रेल्वे : दत्तापुरातील एका ४३ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. १२ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी सतीश मधुकर कोथडे (४६, रा. दत्तापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ

खल्लार : रामतीर्थ येथील एका विवाहितेला हुंडा न आणल्याबद्दल व मुल होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, ११ जूनपूर्वी ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी स्वप्निल शेळके, विनायक शेळके व अन्य एक (सर्व रा. रामतीर्थ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

‘वसतिशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा जोडावी’

अमरावती : राज्यात मोठ्या प्रमाणावर वसतिशाळा शिक्षक नियमित झाले आहेत. या शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा जोडण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदनातून केली आहे.

-----------------

पैसे भरले, ट्रान्सफाॅर्मर केव्हा

शिरखेड : तीन वर्षे होऊनसुद्धा डीबीवर ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आले नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. निंभी येथील शेतकरी आनंद अमृते यांचे मौजा संभापूर येथे शेती असून, त्यांनी त्यांच्या शेतात वीज जोडणी मिळवण्याकरिता १३ जून २०१८ रोजी महावितरणकडे पैशांचा भरणा केला. महावितरणने विहिरीजवळ पोलसुद्धा उभे केले. पण, अजूनपर्यंत तिथे ट्रान्सफाॅर्मर बसविले गेले नाही.

-------------

सलग दुसऱ्या वर्षीही ऑनलाईनचे संकेत

अमरावती : शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागात पालक आपल्या पाल्यांना, गुरुवर्यांना विचारताना दिसून येत आहेत. आता पुन्हा शासनाने १५ जूनपर्यंत काही शिथिलता देत लॉकडाऊन कायम केले आहे. दरवर्षी १५ जून व २६ जून पासून शाळेची घंटा वाजत असते. परंतु, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या लाटेमुळे लॉकडाऊन कायम केल्याने शाळा ऑनलाईनच सुरू राहतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.

--------------------

दक्षता समित्यांवर सर्वाधिक जबाबदारी

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच गावोगावी ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून भरीव जनजागृती करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.

---------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.