शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:11 AM

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा येथे विशाल विलास लोंढे (२७) याला काठीने मारहाण करण्यात आली. ...

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा येथे विशाल विलास लोंढे (२७) याला काठीने मारहाण करण्यात आली. वाद सोडविण्यास आलेल्या त्याच्या आईलादेखील मारहाण करण्यात आली. १३ मे रोजी वडुरा येथे ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी विलास लोंढे (बडनेरा), प्रदीप लोंदे (वडुरा) व विकास लोंदे (गोपालनगर, बडनेरा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

वायफाय टॉवरची बॅटरी लंपास

धारणी : तालुक्यातील हरिसाल नांदुरी येथील वायफाय टॉवरमधील दोन बॅटरी लंपास करण्यात आल्या. २८ एप्रिल रोजी ही घटना घडली. मो. सोहेल खान (रा. खापरखेडा) यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

भुलोरी येथे मुलावर हल्ला

चिखलदरा : तालुक्यातील भुलोरी येथे अनिल कालू जामुनकर याचे मानेवर कु-हाडीने हल्ला करण्यात आला. १३ मे रोजी ही घटना घडली. एका महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी आरोपी कालू मन्नू जामुनकर (५४, भुलोरी) विरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.

-------------

धामणगाव गढी येथे दुचाकी जाळली

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथे इम्रान शाह इब्राहिम शाह (२१) याची एमएच २७ बीओ ०३१६ या क्रमाकांची दुचाकी जाळण्यात आली. १२ मे रोजी रात्री ११ नंतर ही घटना उघड झाली. याप्रकरणी इम्रानशाह यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी १३ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

शिंदी येथे इसमाला मारहाण

पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे शरद ढेपे (४६) यांना लाकडी झिल्पीने मारहाण करण्यात आली. १२ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. पथ्रोट पोलिसांनी आरोपी नितीन गंगाधर सोनार (३९) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

पार्डी येथे तरुणाला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील पार्डी येथे शुभम बायस्कर (२०) याला मारहाण करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून १२ मे रोजी रात्री हा वाद झाला. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी हेमंत चिटकुले, सचिन मोंढे, नितीन मोंढे (रा. पार्डी) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------

आष्टगाव येथे महिलेला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील आष्टगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. घराच्या जागेवरून हा वाद झाला. ९ मे रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी आकाश विनोद आकोलकर, मयूर विनोद आकोलकर व विनोद शामराव आकोलकर (तिघेही रा. आष्टगाव) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

फोटो पी १५ नाथे

हरिदास नाथे

शिंदी बु. : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा अचलपूर पंचायत समितीचे माजी सभापती हरिदास नाथे (६८, रा. कुष्टा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली बराच मोठा आप्त परिवार आहे.

-------------

फोटो पी १५ रोटरी

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन भेट

अमरावती : विचक्षण आरोग्यधाम दवाखाना, भाजीबाजारला दिव्य योग साधना ट्रस्ट व छांगाणी परिवाराकडून कॉन्सन्ट्रेशन मशीन डोनेट करण्यात आली. रोटरी क्लबच्या अध्यक्ष संध्या उंबरकर व रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुच्छा यांनी मनोगत व्यक्त करून छांगाणी परिवार व दिव्य योग साधना ट्रस्टचे आभार मानले.

---------

फोटो पी १५ रावळगाव

चवळीच्या उभ्या पिकात सोडली जनावरे

आसेगाव पूर्णा : लगतच्या रावळगाव येथील शेतकरी संजीव जवंजाळ यांनी आपल्या शेतात चवळीचे उत्पादन घेतले. मात्र, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडली. या लॉकडाऊनचा त्यांना सर्वाधिक फटका बसला. साधा वाहतुकीचा खर्चदेखील निघत नसल्याने त्यांनी चवळीचे उभे पीक जनावरांसाठी मोकळे केले.

--------

काटपूरमध्ये लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी

काटपूर : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीने काटपूर गावातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहे. सर्वत्र शुकशुकाट पसरलेला आहे. जिकडेतिकडे स्मशानशांतता दिसून येते. गजबजलेली रस्ते ओस पडली आहेत. मोर्शी तहसील यंत्रणेकडून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

--------------

वृंदावन कॉलनीतून दुचाकी लांबविली

चांदूरबाजार : येथील वृंदावन कॉलनीमधून एमएच २७ बीके ५५३५ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी संतोष तायडे (४६) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला. शहरात लॉकडाऊन असतानाही दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.

----------------

मोबाईलच्या अतिवापराने दृष्टी आजाराची बाधा

अमरावती : मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सारामुळे दृष्टी आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शाळेतच एक दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांना दृष्टी दोषापासून मुक्ती द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

----------------

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

कावली वसाड : गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली. मात्र, जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. रात्री शेतात राहून ओलित करतात. मात्र, वन्यप्राण्यांच्या वाढता हैदोस शेतकरीमारक ठरला आहे.

----------

विवाह समारंभात केवळ १५ लोक

वरूड : कोरोना संसर्गामुळे डेकोरेशन, बिछायत केंद्र आणि सभागृह चालकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. विद्युत देयके सुद्धा भरण्याकरिता पैसा नसल्याने अनेकांचे वीज पुरवठा खंडित झाला. उपजीविका कशी करावी हा प्रश्न असताना आता जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभाकरिता केवळ १५ जणांना परवानगी दिली. १५ लोकांमध्ये विवाह कसा करावा, असा यक्षप्रश्न वधूपित्यासमोर उभा ठाकला आहे.

-----------

दर्शनी भागात जनजागृतीपर फलक शोभेचे

मोर्शी : येथील अनेक आस्थापना, कार्यालयात, बँकेमध्ये कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ना लोक मास्क घालून सेतूत प्रवेश करत ना विनामास्क प्रवेश करणाऱ्याला कुणी अटकाव घालत. हॅन्ड सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग तर केव्हाचेच बाद झाले आहे. कुठेही हॅन्ड सॅनिटायझर ठेवलेले नाही. पारदर्शक पडदे देखील कालबाह्य ठरले आहेत.

--------------

रेशन दुकानदारांनो, ग्राहकांचे व्हॉटअ‍ॅप ग्रुप करा

अमरावती : जिल्हाधिकारी शेैलेश नवाल यांनी १४ मे रोजी लॉकडाऊनसंदर्भात नवीन आदेश काढले आहेत. त्यात रेशन दुकानेही सकाळी सात ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हाॅटसॲप ग्रुप तयार करून टोकन सिस्टिमचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. गर्दी होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

-----------

तीन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नियोजन

अमरावती : लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून कोणतेही वाहन आल्यास त्यातील व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. राज्य सीमावर्ती परिसरात मोर्शी, अचलपूर, धारणी एसडीओंनी तसे तपासणी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

------------

मनसेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

शेंदूरजनाघाट : मनसेच्या शेंदूरजनाघाट शहर अध्यक्ष दी चंदू तरार यांची, तर वरूड अध्यक्षपदी पवन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे अमरावती महानगरप्रमुख संतोष बद्रे, उपजिल्हाध्यक्ष विपुल हिवसे, मोर्शी तालुका अध्यक्ष नितीन लुंगे, अण्णा भोंगाडे, बाबू काकडे, दीपक पाटील, रोशन लोखंडे, तुषार अकर्ते, जगदीश वानखडे, नितेश शर्मा यांनी अभिनंदन केले.

---------------

फोटो पी १५ शेंदुरजनाघाट

शेंदूरजनाघाट पीएचसीत परिचारकिा दिन

शेंदूरजनाघाट : जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूरजना घाट येथे तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते परिचारिका दीपाली तोटे, कल्पना सरणकर, अर्चना बेले, डॉ. पूर्वा खडक्कर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

--------