उखडलेल्या रस्त्यावरून सुलभा खोडके संतापल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:53+5:30
या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी पदाधिकाऱ्यांसह या मार्गाची सोमवारी पाहणी केली.

उखडलेल्या रस्त्यावरून सुलभा खोडके संतापल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदनी चौक, वलगाव मार्ग व राजापेठ परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पूर्ण वाट लागली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे चित्र असल्याने आमदार सुलभा खोडके यांनी बांधकाम विभागाला खडेबोल सुनावले. १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असल्याने तत्पूर्वी हा परिसर खड्डेमुक्त करण्याची सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला केली.
या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी पदाधिकाऱ्यांसह या मार्गाची सोमवारी पाहणी केली. यावर्षी सतत पाऊस पडत असल्याने शहरातील रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून या खड्ड्यांची खोली वाढतच चालली आहे. जनसामान्यांची सुरक्षितता, सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आमदार खोडके यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांना या पाहणी दौºया दरम्यान केल्यात.
दर्जेदार रस्ते बांधकामासह त्याची देखभाल करण्याची जबाबदारी लक्षात घेता अपघात विरहीत शहराकरिता नागरिकांच्या सुरक्षेला घेऊन कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना भौतिक सुविधा, नागरी तसेच मूलभूत सुविधांच्या पूर्ततेचे अभिवचन नागरिकांना दिले होते. त्या अनुषंगाणे त्यांनी पाहणी केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र पक्षाचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.