विद्यार्थ्यांना पोलीसदादांकडून माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:31+5:30
विद्यार्थ्यांनीही कुतूहल होऊन पोलीसदादांचा कामकाजाची माहिती उत्सुक्तेने जाणून घेतली. सदर ‘रेझिंग डे’चे उद्घाटन ठोसरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व बालगुन्हेगाराचे होणारे दृष्परिणाम, बालगुन्हेगांरापासून बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व त्यापासून घ्यावयाची दक्षताबाबतसुद्धा त्यांनी माहिती दिली. वाहतुकींच्या नियमासंदर्भात पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांना पोलीसदादांकडून माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेझींग डे सप्ताह २ ते ६ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त नागपुरीगेट ठाण्यात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रांची तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनीही कुतूहल होऊन पोलीसदादांचा कामकाजाची माहिती उत्सुक्तेने जाणून घेतली. सदर ‘रेझिंग डे’चे उद्घाटन ठोसरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व बालगुन्हेगाराचे होणारे दृष्परिणाम, बालगुन्हेगांरापासून बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व त्यापासून घ्यावयाची दक्षताबाबतसुद्धा त्यांनी माहिती दिली. वाहतुकींच्या नियमासंदर्भात पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला दंत चिकित्सक सैयद अबरार, मुख्यध्यापक प्रकाश मेश्राम, मंगला व्यास, अनिता भांगे, राजेश्री कुलकर्णी, निखत परवीन उपस्थित होते. यावेळी १५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज, गुन्हेसंदर्भातील रिपोर्ट ते वैद्यकीत तपासणीची माहिती देण्यात आली. कॅम्प्युटर, ऑनलाईन प्रणाली, बिनतारी संच, वॉकीटॉकी, आधुनिक मालखाना, लॉकअप गार्ड, आदींची माहिती देण्यात आली. यावेळी पीआय संजय जव्हेरी, एपीआय राहुल जाधव, पीएसआय प्रशांत लभाने, पुरुषोत्तम ठाकरे, विलास पोवळेकर, चंद्रकांत बोके, विजय राठोड, विनोद इंगळे, रामेश्वर टाकळे, योगेश गावंडे, विक्रम देशमुख, मोहन तायवाडे, आबीद शेख, दामोधर मिलके, दिप्ती ठाकूर, हर्षाली वानखडे, निशा चौधरी उपस्थित होते.