शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:19 IST

स्थानिक श्री हव्याप्र मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे श्वानभक्षण प्रकरण ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र गाजत आहे.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासन उदासीन : ‘वसा’ संस्थेने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक श्री हव्याप्र मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे श्वानभक्षण प्रकरण ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र गाजत आहे. या पार्श्वभूमिवर पशू-पक्षी व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत स्थानिक ‘वसा’ संस्थेनेदेखील पशू हत्येसंदर्भातील काही कायदेशीर बाबींना सामाजिक जबाबदारी म्हणून अधोरेखित केले आहे. मात्र, कायद्यात एवढ्या कठोर तरतुदी असूनही पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी मात्र, या प्रकरणाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.‘वसा’ संस्थेचे सर्पमित्र रितेश हंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्या प्राण्यांवरील अन्याय रोखण्याकरिता तत्कालीन विधिमंडळाने ‘अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडिया’ची स्थापना केली. या आधारे ‘दि प्रिव्हेंशन आॅफ क्रुएल्टी आॅफ अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट-१९६०’ची मांडणी करण्यात आली. या कायद्यांतर्गत सर्व प्रकारच्या जिवंत प्राण्यांना काडी-दगड किंवा तत्सम वस्तुने मारणे, लाथाडने, त्यांच्या अंगावरून वाहन नेणे, छळ करणे, जखमी करणे, हानीकारक औषधींचा प्रयोग करून मारणे, डांबून ठेवणे, त्रास होईल या पद्धतीने बांधून ठेवणे, गरजेप्रमाणे खाद्य, पाणी व निवारा न पुरविणे, जीवानिशी मारणे, क्रूर पद्धतीने ठार करणे याला दंडनीय अपराध मानले गेले आहे. ज्यामध्ये आर्थिक भुर्दंड व कारावास अशा दोन्ही तरतुदी आहेत. मात्र, कायदा एवढा कठोर असूनही अद्याप श्वानभक्षणप्रकरणी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहातील त्या परप्रांतीय विद्यार्थ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पशूप्रेमींनी उपस्थित केला आहे. यावरून कुठेतरी माशी शिंकते आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.यापूर्वी झालेल्या कारवायासन २०१५ च्या मे महिन्यात मणिपूर येथील सुभाषनगर परिसरातील ३ युवकांना श्वानभक्षण प्रकरणी अटक करण्यात आली होेती. त्यांनी पाळीव श्वानाला ठार मारून शिजवून खाल्ले होते. पुराव्यानिशी त्यांना अटक झाली होती. त्यानंतर बंगळुरू येथील तीन विद्यार्थ्यांनी देखील पाळीव श्वानाला ठार करून मांसभक्षण केले होते. त्यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. चेन्नई येथे ६ जुलै २०१६ रोजी मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांनी श्वानाला उंचावरून खाली फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.