मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अजब निर्णय, वन विभागात मनमानी अतिरक्त चार्जचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:29 IST2026-02-14T14:28:08+5:302026-02-14T14:29:08+5:30

Amravati : नेमकं चाललं काय; अमरावतीत दोन ‘डीएफओ’ असताना ‘एसीएफ’कडे प्रभार

Strange decision of Melghat Tiger Project, reward for arbitrary excess charge in forest department | मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अजब निर्णय, वन विभागात मनमानी अतिरक्त चार्जचं बक्षीस

Strange decision of Melghat Tiger Project, reward for arbitrary excess charge in forest department

अमरावती :अमरावतीत दोन डीएफओ असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओंचा कार्यभार कनिष्ठ असलेले सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यांना देण्यासाठी कुणाचे दबावतंत्र वापरले, हा संशोधनाचा विषय ठरू लागला आहे. सध्या अमरावती वन विभागात मर्जी सांभाळणाऱ्यांना नियमबाह्य प्रभार देण्याचा प्रघात पडला आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांच्या कार्यालयात डीएफओ (उपवनसंरक्षक) पद कार्यरत आहे. या पदावर यापूर्वी मनोज खैरनार यांची बदली झाल्यानंतर अमरावतीत नुकतेच पदोन्नतीवर आलेले डॉ. मयूर भैलुमे यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओचा कारभार एका वरिष्ठ आयएफएस महिला अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून देण्यात आला आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२५ पर्यंत भैलुमे यांच्याकडे कार्यभार असताना अमरावती येथे दक्षता पथकाचे कमलेश पाटील आणि सामाजिक वनीकरणात प्रथमेश हडपे यांची डीएफओ यांची पदोन्नतीनुसार नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओ पदाचा कारभार सामाजिक वनीकरणाचे डीएफओ प्रथमेश हडपे यांना देण्यात आला असतानाच अगदी दोन आठवड्यांमध्ये हडपे यांच्याकडे असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओ पदाचा कार्यभार एसीएफ मयूर भैलुमे यांना देण्यात आला. यावरून स्पष्ट होते की, भैलुमे यांनी दबावतंत्राचा वापर करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओ पदाचा प्रभार घेतला आहे.

वरिष्ठ असताना कनिष्ठांना चार्ज का?

शासन निर्णयानुसार एखाद्या पदाचा चार्ज समकक्ष पदावरील अधिकाऱ्यास देणे बंधनकारक आहे. त्यानुसार सामाजिक वनीकरणाचे डीएफओ प्रथमेश हडपे यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डीएफओ पदाचा प्रभार देण्यात आला. मात्र, दाेन आठवड्यांत असे काय सूत्रे फिरले की डीएफओ हडपे यांच्याकडील चार्ज काढून तो कनिष्ठ एसीएफ भैलुमे यांना देण्यात आला. अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षकांमार्फत दबावतंत्राचा वापर करून प्रथमेश हडपे यांचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कार्यभार काढण्यात आला, अशी वन विभागात चर्चा रंगू लागली आहे. कारण मयूर भैलुमे यांना पदोन्नती मिळून जेमतेम वर्ष लोटले असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा नियमबाह्य चार्ज देण्यात आला तो आजतागायत कायम आहे.

५ टक्के अतिरिक्त वेतन

अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्यांना शासन निर्णय २०१५ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या उपकलम ५६ नुसार ५ टक्के अतिरिक्त वेतन मिळते, असे आदेश आहेत. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार अनेक महिने सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात ५ टक्के रक्कमेचा अतिरिक्त फायदा मिळते, हे विशेष.

"मेळघाट व्याघ्र प्रकल्पात डीएफओ हे पद रिक्त असल्याबाबत वरिष्ठांना कळविले होते. त्यानुसार वरिष्ठांनी सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यांच्याकडे डीएफओ पदाचा प्रभार सोपविला आहे."
- आदर्श रेड्डी, क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प

Web Title : मेलघाट बाघ अभयारण्य का विवादास्पद फैसला: वन विभाग में भाई-भतीजावाद?

Web Summary : मेलघाट बाघ अभयारण्य में विवाद, कनिष्ठ अधिकारी को प्रभार, वरिष्ठों को दरकिनार। दबाव की रणनीति और नियमों के उल्लंघन के आरोप, वन विभाग में भाई-भतीजावाद और अतिरिक्त प्रभार से संभावित वित्तीय लाभ पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Melghat Tiger Reserve's Controversial Decision: Favoritism in Forest Department?

Web Summary : Controversy surrounds Melghat Tiger Reserve as a junior officer receives charge, bypassing seniors. Allegations of pressure tactics and rule violations are rife, raising questions about favoritism within the forest department and potential financial benefits from the additional charge.