शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:16 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने

१५० कार्यकर्त्यांना अटक : चांदूरबाजार नाक्यावर वाहनांच्या रांगापरतवाडा : शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाक्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रीयीकृत बॅँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, पाच एकर व पाच एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा. कृषी संबंधित शासनाने दिलेल्या योजनांचे नियम व अटी शिथील करावे, कृषी मंत्रालयाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची पुस्तिका काढून शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुका अध्यक्ष विजय पोटे, जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, राहुल अतकरे, सचिन जिचकार,देवराव केदार, रितेश कडू, अंकुश जवंजाळ, सुधीर बदरके, श्याम पिसार, चेतन चौधरी, स्वप्निल सोलव, नीकेश उघडे, रुपेश शर्मा, अमोल भुयार, उमेश भुयार, प्रमोद चौधरी आदी आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)वाहनांच्या रांगा, अटक व सुटका मनसे कार्यकर्ते रास्तारोको आंदोलनात उतरल्याने परतवाडा अमरावती मार्गावरील वाहनांची दुतर्फा रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करुन वाहतूक सुरळीत केली व नंतर सोडून देण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकरी हिताचे असल्याचे पाहून प्रवासातील काही शेतकरी वाहनातून आपला पाठींबा दर्शवित होते हे विशेष.