मेळघाटात रेशनच्या गव्हात खडे आणि मातीचा भरणा; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:12 IST2026-03-27T17:10:54+5:302026-03-27T17:12:35+5:30

Amravati : तालुक्यातील काटकुंभ येथील शासकीय रास्त भाव धान्य दुकानातून मार्च महिन्यात वाटप करण्यात आलेल्या गव्हात मोठ्या प्रमाणात खडे आणि माती आढळून आली आहे.

Stones and soil mixed in ration wheat in Melghat; Health issue on the agenda | मेळघाटात रेशनच्या गव्हात खडे आणि मातीचा भरणा; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Stones and soil mixed in ration wheat in Melghat; Health issue on the agenda

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा :
तालुक्यातील काटकुंभ येथील शासकीय रास्त भाव धान्य दुकानातून मार्च महिन्यात वाटप करण्यात आलेल्या गव्हात मोठ्या प्रमाणात खडे आणि माती आढळून आली आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि भेसळयुक्त गहू रेशन कार्डधारकांच्या माथी मारला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत काटकुंभच्या सरपंच ललिता बेठेकर यांनी थेट तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली.

शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या धान्यावर मेळघाटातील गरीब आदिवासी कुटुंबांचे पोषण अवलंबून असते. मात्र, काटकुंभ येथील रेशन दुकानात या महिन्यात जो गहू आला आहे, त्यात धान्यापेक्षा खडे आणि मातीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. स्वतः सरपंचांनी जेव्हा या गव्हाची पाहणी केली, तेव्हा हा गहू दळल्यानंतर त्याची पोळी खाण्यायोग्य होत नसल्याचे समोर आले. गव्हातील खडे आणि माती निवडूनही धान्य स्वच्छ होत नसल्याने गृहिणींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता या तक्रारीनंतर पुरवठा विभाग संबंधित रेशन दुकानातील साठ्याची तपासणी करून काय कारवाई करतो, याकडे काटकुंभ येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

निकृष्ट दर्जाचा आणि कचरायुक्त गहू खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हा गहू खाण्यायोग्य की फेकून देण्यायोग्य, असा प्रश्न आता लाभार्थी विचारत आहेत. सरपंच ललिता बेठेकर यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना या प्रकाराची माहिती देऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.

"रेशनच्या गव्हात मोठ्या प्रमाणावर खडे आणि मातीची भेसळ आहे. हा गहू वापरणे अशक्य असून लोकांच्या आरोग्याशी हा खेळ आहे. प्रशासनाने या साठ्याची तातडीने चौकशी करून चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे."
- ललिता बेठेकर, सरपंच, काटकुंभ

Web Title : मेलघाट राशन गेहूं में पत्थर और मिट्टी; स्वास्थ्य खतरे में।

Web Summary : काटकुंभ के राशन की दुकानों में पत्थर और मिट्टी वाला घटिया गेहूं बांटा गया। ग्रामीणों में आक्रोश है, क्योंकि इससे स्वास्थ्य संबंधी खतरे हैं। सरपंच ने शिकायत दर्ज कर तत्काल कार्रवाई और गुणवत्तापूर्ण अनाज की मांग की है।

Web Title : Stones and soil found in Melghat ration wheat; health at risk.

Web Summary : Substandard wheat with stones and soil was distributed in Katkumbh's ration shops. Villagers are angry, as this poses health risks. The Sarpanch has lodged a complaint, demanding immediate action and quality grain.