शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
3
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
4
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
6
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
7
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
8
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
9
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
11
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
12
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
13
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
14
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
15
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
16
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
17
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
18
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
19
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
20
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या वन विभागात बदली धोरणाला बगल; 'साइड पोस्टिंग'ची अनेक पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:24 IST

Amravati : 'प्रादेशिक' उपविभागाला पसंती, २०१७च्या आदेशाला मूठमाती

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील शासन निर्णयाला बगल देत, निवडक स्वरूपात बदल्यांचे धोरण राबविले जात आहे. परिणामी 'साइड पोस्टिंग' म्हणून ओळखली जाणारी अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत.

महसूल व वन विभागाने दि. २२ मे २०१७ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, संशोधन व प्रशिक्षण आणि मूल्यांकन या प्रत्येक विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किमान तीन वर्षे सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ वनपरिक्षेत्र अधिकारीवगळता इतरांच्या बदल्यांसंदर्भात या आदेशाला बगल दिली जात आहे.

प्रत्येक शाखेत तीन वर्षे कार्य आणि अनुभव घेण्याचे धोरण असताना बदलीसाठी मात्र प्रादेशिक उपविभागात उड्या पडत आहेत. गत पाच वर्षांपासून सहायक वनसंरक्षक, वनपाल आणि वनरक्षकांच्या बदल्या 'प्रादेशिक टू प्रादेशिक' होत आहेत.

आरएफओंची बदल्यांसाठी लाखोंची बोलीवनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा बिगुल वाजला असून, मलईदार जागेवर पोस्टिंगसाठी सत्तापक्षाच्या आमदार, खासदारांचे शिफारस पत्र मिळविण्यासाठी बदलीपात्र आरएफओंचे प्रयत्न सुरू आहेत. विश्वसनीय सूत्रानुसार प्रादेशिक परिक्षेत्रासाठी ७ ते १५ लाखांपर्यंत बोली लागत आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बदलीसाठी लोकप्रतिनिधींचे पत्र न घेण्याचा आदेश निर्गमित केला असतानाही काही आरएफओ बदलीसाठी आमदारांचे उंबरठे झिजवत आहेत. बदली धोरणानुसार प्रादेशिक, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण अशा क्रमानुसार आरएफओंच्या बदल्यांची प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. मात्र, वन्यजीव विभागात जाण्यास कोणीच उत्सुक नाही.

साइड पोस्टिंग' रिकाम्याचशासन आदेश २०१७नुसार बदली पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यरत उपविभागाचा विचार करूनच इतर विभागांची शिफारस करणे अभिप्रेत आहे. मात्र, वनपाल, वनरक्षकांना वन्यजीव उपविभाग न देता 'प्रादेशिक टू प्रादेशिक' पोस्टिंग दिली जाते. त्यामुळे वन्यजीव, सामाजिक वनीकरण, मूल्यांकन, कार्य आयोजन या 'साइड पोस्टिंग' रिकाम्या राहतात.

"वनाधिकारी असो वा कर्मचारी यांच्या बदल्या या शासन निर्णयानुसार झाल्या पाहिजेत. मात्र, या प्रक्रियेला बगल देण्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तसे निर्देश संबंधितांना देण्यात येतील."- गणेश नाईक, वन मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्र