जिल्ह्यात २८९४ शाळांतील चित्र, दीड वर्षांपासून शाळा बंदमुळे शिक्षकही वैतागले, ऑनलाईन शिक्षणाचा पहिला दिवस
अमरावती : गतवर्षी मार्चमध्ये कोरोना आला नि शाळा बंद झाल्या. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २८ जूनपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवशी विद्यार्थी घरी आणि शिक्षक शाळेत असे आगळेवेगळे चित्र दिसून आले. एरवीसारखे शाळेत किलबिलाटाचे चित्र मात्र अनुभवता आले नाही. पहिल्या दिवशी ऑनलाईन केवळ कागदावरच होते.
सोमवारपासून सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक सत्रानुसार पहिली ते नववीपर्यंत शिक्षण ऑनलाईन, दहावी व बारावीसाठी शिकवणी, तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा आहे. दहावी, बारावी विषय शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती, तर पहिली ते नववी, अकरावीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला दिवशी बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र, ऑनलाईन शिक्षणाचे तास, शिक्षकांच्या कामांचे नियोजन, ऑनलाईन शिक्षणासाठी उपाययोजनांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी
शाळांमध्ये मंगळवारपासून शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणार आहे.
-------------------
सेतु प्रकल्पाचे उद्घाटन
ऑनलाईन शिक्षणासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या सेतू प्रकल्पाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. मात्र, सेतू ॲप डाऊनलोड करताना नेट कनेक्टिव्हिटीची अडचण कायम आहे. सेतू शिक्षण हे दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
----------------
‘लोकमत’ चमूने या शाळांचे केले निरीक्षण
- महापालिका मराठी शाळा क्रमांक १३, चपराशीपुरा
- महापालिका उर्दू शाळा क्रमांक १३, चपराशी पुरा
- गणेशदास राठी विद्यालय, मोर्शी रोड
- श्री. प्रेमकिशोर सिकची विद्यालय, मोर्शी रोड
- जिल्हा परिषदेची माजी शासकीय कन्या उर्दू शाळा, कॅम्प
- जिल्हा परिषद माजी शासकीय कन्या शाळा, गर्ल्स हायस्कूल
- महापालिका प्राथमिक मुलांची शाळा क्रमांक १, भाजीबाजार
- महापालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक ११, भाजीबाजार
- महापालिका प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १९, रुक्मिणीनगर