शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या ८८ शाखांतील ६०० कर्मचारी आजपासून संपावर

By admin | Updated: May 11, 2015 00:00 IST

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने ....

आता माघार नाही : जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनाअमरावती : कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने संघटनेद्वारा तक्रारी परत घेण्यात आल्यात. परंतु व्यवस्थापनाने हात झटकले, ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे. संघटनेवर कर्मचाऱ्यांचा दबाव वाढत आहे. महागाई भत्यासह इतर मागण्या मान्य होईस्तोवर आता माघार नाही, जिल्ह्यातील ८८ शाखांमधील ६०० कर्मचारी सोमवार ११ मे पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे अमरावती जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांना केंद्रप्रमाणेच महागाईभत्ता देण्यात यावा, असा जिल्हा न्यायालय व कामगार न्यायालयाचा आदेश आहे. व्यवस्थापन मंडळाने जुलै २०११ पासून कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता रोखला आहे. बँक अडचणीत असल्याचे कारण व्यवस्थापन सांगते. प्रत्यक्षात २०११ पासून बँक नफ्यात आहे. २८ कोटी रुपयांचा आयकर बँकेने भरला आहे. ६० टक्के रिटर्नदेखील बँकेला मिळाले असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे यांनी केला. सन १९६२ मध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. बँकेचे ८५ टक्के कर्ज थकीत असताना कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता मिळत होता. केवळ ५ वर्षांत सदर भत्ता रोखण्यात आला आहे, हा महागाईभत्ता तत्काळ मिळावा, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वार सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ थांबवू नये यासह अन्य मागण्यांकरिता सोमवारपासून जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी संपावर जात आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे, कार्याध्यक्ष अनंत सोमवंशी, प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर, यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)लिफ्ट, एसी, बँक तोट्यात कशी ?केवळ एका मजल्यावर जाण्यासाठी बँकेत लिफ्ट लावण्यात येत आहे. व्यवस्थापनाची एसी वाहने दरवर्षी खरेदी होतात. संगणकावर १५ कोटींवर खर्च झाले असताना बँक तोट्यात कशी, असा सवाल बँक कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.रोजची ३५ कोटींची उलाढाल थांबणारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात २ (शाखा व ६०० कर्मचारी आहेत या बँकेची रोजची उलाढाल ३५ कोटींची आहे. सोमवारच्या संपामुळे ही उलाढाल ठप्प होणार आहे. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक व जिल्हा परिषद व पंचायत समितीला याचा फटका बसणार आहे.