शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून एसटी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती.

ठळक मुद्देपाच महिन्यानंतर बसफेऱ्या : जिल्ह्याबाहेर वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात पाच महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गुरुवारपासून जिल्ह्याबाहेर पडणार आहेत. पहिल्या टप्यात नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये एसटी बसची प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे.पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले आहे. अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्यामुळे शासनाने जिल्ह्याबाहेर बस सुरू करण्यास २० आॅगस्ट रोजी हिरवी झेंडी दिली. त्यानुसार उद्यापासून एसटी बस जिल्ह्याबाहेर धावणार आहेत.लॉकडाऊन कालावधीत एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका सहन करावा लागला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हांतर्गत एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी घेवून वाहतूक करावी लागत आहे. अशातच प्रवाशांचा प्रतिसादही खूपच कमी आहे. एक ते दोन तासांच्या फरकाने जिल्ह्यातील आठ एसटी आगारांमधून बस सोडण्यात येत आहेत. सोबतच बस स्थानकाहून सुटलेल्या बस मार्गस्थ कुठेही थांबत नसल्याने कमी प्रवासी घेऊन धावत असलेल्या एसटींकडून महामंडळासाठी खर्च जास्त अन् उत्पन्न कमी मिळत आहे. अशातच आता प्रवाशांच्या मागणीची दखल घेत शासनाने आता जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात येथील मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारामधून जिल्ह्याबाहेर लालपरी धावणार आहे. गुरुवारपासून सुरू होत असलेल्या या सेवेचे यश आर्थिक आखाड्यांवर अवलंबून आहे.अशा असतील आगारातून बसफेऱ्याअमरावती ते यवतमाळ - सकाळी ८, १०, १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजतायवतमाळ ते अमरावती - सकाळी ११ आणि दुपारी १, २, ४ व ५ वाजताअमरावती ते अकोला - सकाळी ८, १० व १२ वाजता, दुपारी २ व ४ वाजताअकोला ते अमरावती - सकाळी ११ वाजता, दु. १, २, ३, ५ व सायं. ७ वाजताअमरावती ते वाशिम- सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजतावाशिम ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.परतवाडा ते अकोला - सकाळी ८, १० व १२ दुपारी २ व ४ वाजता.अकोला ते परतवाडा- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजतावरूड ते नागपूर - सकाळी ८ , १० व १२, दुपारी २ व ४ वाजता.नागपूर ते वरूड- सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजताअमरावती ते वर्धा - सकाळी ८, १० व दुपारी २ व ४ वाजता.वर्धा ते अमरावती - सकाळी ११, दुपारी १, ३ व सायंकाळी ५ वाजता.दर्यापूर ते मूर्तिजापूर - सकाळी ८, १० व १२, दुपारी २ , ४ व ५ वाजता.दर्यापूर ते अकोट - सकाळी १० व १२, दुपारी २, ४ व ५ वाजता.

टॅग्स :state transportएसटी