शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एसटी बसेसना लागणार ट्रॅकिंग सिस्टीम, घरबसल्या गाडीचे लोकेशन कळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:55 IST

अमरावती : प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्यासाठी एसटी महामंडळात नानाविध उपक्रम राबविले जात असतानाच यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे.

जितेंद्र दखानेअमरावती : प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्यासाठी एसटी महामंडळात नानाविध उपक्रम राबविले जात असतानाच यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. प्रवाशांची सुरक्षा व त्यांना बसची माहिती मिळावी यासाठी राज्यातील सर्व एसटी बससेवा ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे. या सिस्टीममुळे प्रवाशांना घरबसल्या एसटी बसचे ‘लोकेशन’ समजणार आहे.या सिस्टीममुळे बसस्थानकात किंवा थांब्यावर गाडीची प्रतीक्षा करणा-या प्रवाशांना गाडीची स्थिती समजणार असल्याने आता प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. प्रवाशांना आता बसल्या ठिकाणी एसटी बसची माहिती मिळणार आहे. त्यासाठी एसटीच्या सर्व बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. एखादी बस नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा मार्ग काढणे यामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणा-या प्रवाशांना लगेच माहिती मिळण्यासह त्यांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.एसटी बसचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्यस्थिती समजण्यास मदत व्हावी, याकरिता महामंडळाकडून मागील वर्षभर व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणेवर काम केले जात आहे. यंत्रणा बसवताना किंवा बसवल्यानंतर येणा-या अडचणी प्रवासी वर्गाला त्याला कितपत फायदा होईल याची माहिती महामंडळाकडून घेतली जात होती. अखेर तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी अद्याप विभागीय नियंत्रक कार्यालयास  कुठल्याही सूचना मिळाल्या नसल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

लोकेशन कळणारएखादी एसटी स्थानकात किंवा आगारातून वेळेवर पोहोचत नाही त्या एसटीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य बससेवेवर होतो. मात्र आता ट्रॅकिंग सिस्टीम यंत्रणेमुळे नियोजित एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेमुळे नियोजित आणि अधिकृत बसथांब्यावर एखादी बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला मिळेल आणि त्यानुसार संबंधित चालक व वाहकावर कारवाईदेखील करता येईल.

टॅग्स :Amravatiअमरावती