एसटी बस-ट्रकचा अपघात; ३५ जखमी
By गणेश वासनिक | Updated: May 8, 2023 20:02 IST2023-05-08T20:02:28+5:302023-05-08T20:02:47+5:30
Amravati News अमरावती-चांदूर बाजार मार्गावर शिराळानजीक एसटी बस व ट्रकच्या अपघातात सुमारे ३५ जण जखमी झाले. सायंकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला.

एसटी बस-ट्रकचा अपघात; ३५ जखमी
गणेश वासनिक
अमरावती : अमरावती-चांदूर बाजार मार्गावर शिराळानजीक एसटी बस व ट्रकच्या अपघातात सुमारे ३५ जण जखमी झाले. सायंकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला.
अमरावती येथून आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमीची संख्या जास्त असल्याने त्यांच्या फेऱ्या करण्यात आल्या. सहा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस अमरावतीहून चांदूर बाजारकडे येत होती. अपघात होताच ट्रकचालकाने घटनास्थळाहून पलायन केले. जखमींमध्ये चार ते पाच शाळकरी मुले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.