रोलर स्केटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:50 IST2019-08-31T23:49:39+5:302019-08-31T23:50:16+5:30

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेला शहरातील क्रीडापटूंकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा मोर्शी मार्गावरील जिल्हा स्टेडियम येथे २९ आॅगस्टला सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत घेण्यात आली.

Spontaneous response to roller skating competition | रोलर स्केटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रोलर स्केटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच, दी अमरावती डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा संयुक्त उपक्रम

अमरावती : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेला शहरातील क्रीडापटूंकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा मोर्शी मार्गावरील जिल्हा स्टेडियम येथे २९ आॅगस्टला सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत घेण्यात आली.
स्पर्धेमध्ये ५ ते १४ वर्षांपर्यंत विविध गटांमध्ये सुमारे अडीचशे मुलामुलींनी सहभाग घेतला. प्रत्येक गटातून तीन मुले व तीन मुली यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. लोकमत बाल विकास मंच व दी अमरावती डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पार पडली. परिक्षक म्हणून श्याम भोकरे, स्वप्नील भोकरे व प्रफुल्ल मेहता यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत जिल्हा क्रीडा कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Spontaneous response to roller skating competition