नवाथे मल्टिप्लेक्स प्रकल्पाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:57+5:30
मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्राप्त करावी लागणार आहेत.

नवाथे मल्टिप्लेक्स प्रकल्पाला गती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवाथे मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्सचा विषय आता समोर आलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बांधकामासाठी पुर्ननिविदा काढता येणार आहे. त्याअनुषंगाने प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. २३ आॅगस्टच्या ‘स्थायी’च्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
मल्टिप्लेक्स व कमर्शियल कॉप्लेक्स प्रकल्पाचा सविस्तर आराखडा वास्तुतज्ञाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच स्टक्चरल डिझाइन नोंदणीकृत तज्ज्ञांकडून करून घ्यावे लागेल तसेच प्रकल्पासाठी लागणारे सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ प्राप्त करावी लागणार आहेत. या प्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक बनविणे, त्याला महापालिका वा सबंधित विभागाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, प्रकल्पासाठी लागणारी सर्व ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ याकरिता बांधकाम विभाग, रेल्वे विभाग, पर्यावरण विभाग, पाटबंधारे विभाग, भूजल सर्र्वेक्षण विभाग आदींची परवानगी महापालिकेला मिळवून देणे, प्रकल्प बांधकामासाठी शासननिर्णयानुसार फर्म तयार करणे, यासाठी अटी, शर्ती व निविदा तयार करणे, या निविदा प्रक्रियेतून योग्य एजन्सीची पडताळणी करून कार्यारंभ आदेश देणे यांसह अन्य बाबींना ९ आॅगस्टला महापालिका आयुक्त व २३ आॅगस्टला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.