शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सभेचा प्रस्ताव धुडकावला!

By admin | Updated: March 8, 2016 00:15 IST

'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती.

जिल्हा परिषद : २५ सदस्यांची होती मागणीअमरावती : 'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती. मात्र हा प्रस्तावच सत्ताधाऱ्यांनी धुडकावल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व मागील दोन वर्षांपासून पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या लेखाशिर्षातून खर्च करण्यात येत आहे. यामधील कामाचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार आणि पाणीटंचाई विषयावर विशेष सभा बोलावण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्षांकडे लावून धरली होती. यासंदर्भात २५ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र अध्यक्षांना मंगळवार २३ फेब्रुवारीला दिले होते. जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कितपत फायदेशीर ठरला यासह दोन वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार, पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी पत्राद्वारे अध्यक्षांकडे केली आहे. या पत्रावर जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, जया बुंदिले, चित्रा डहाणे, वनमाला खडके, सुषमा कलाने, विद्या तट्टे, संगीता चक्रे, वर्षा आहाके, अरुणा गावंडे, सुनीता देशमुख, पुष्पा सावरकर, मंदा गवई, सुधाकर उईके, प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील, ममता भांबूरकर, भुरा बेठे, चंद्रपाल तुरकाने, सदाशिव खडके आदी जि.प. सदस्य आणि विनोद टेकाडे, गणेश राजनकर, अर्चना वेरुळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र सदस्यांच्या मागणीचा हा प्रस्तावच जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाने फेटाळल्याने याविषयावरच पडदा टाकण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)काही सदस्यांचे समाधान झाल्याचे पत्रजिल्हा परिषदेतील जवळपास २५ सदस्यांनी जलयुक्त शिवार व पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी केली होती. मात्र यावर स्वाक्षरी करणाऱ्या काही सदस्यांनी आमचे समाधान झाल्याचे पत्र अध्यक्षांकडे दिले आहेत. मग अगोदरच सभेची मागणी करण्यासाठी निवेदनावर स्वाक्षरी क शाला केली, अशी चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी विशेष सभेसाठी माझ्याकडे लेखी पत्र दिले होते. मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.- सतीश उईके, अध्यक्ष, जिल्हा परिषदजलयुक्त शिवार व पाणी टंचाईची विशेष सभा बोलविण्यात यावी यासंदर्भात काही सदस्यांचे पत्र अध्यक्षांना दिले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा काढला नाही.- सतीश हाडोळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद