शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

सोयाबीनचे मातेरे, सर्वेक्षण केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:29 IST

यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसात सलग खंड असल्याने दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन जागीच विरले. सोंगणीचा खर्च निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील पिकात शेतकऱ्यांनी गुरे सोडली. जिल्ह्यातील किमान ४० टक्के क्षेत्रातील ‘कॅश क्रॉप’चे मातेरे झालेले असतानाही शासन, प्रशासनाला केव्हा जाग येणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी ४० दिवसांची : उत्पादनात कमी; शासनाला केव्हा येणार जाग ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसात सलग खंड असल्याने दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन जागीच विरले. सोंगणीचा खर्च निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील पिकात शेतकऱ्यांनी गुरे सोडली. जिल्ह्यातील किमान ४० टक्के क्षेत्रातील ‘कॅश क्रॉप’चे मातेरे झालेले असतानाही शासन, प्रशासनाला केव्हा जाग येणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.मागील वर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांचा घात केल्यामुळेच यंदाच्या खरिपात सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली. अडचणीतील शेतकºयांनी या नगदी पिकाची मदत होईल, ही आशा आता फोल ठरली आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पावसानंतर यंदा सोयाबीन साथ देणार, अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, १० आॅगस्टपासून आतापर्यंत पावसाने दडी मारल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीमधील सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या. दाणा भरलाच नाही. काही जमिनीत पावसाअभावी व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन जागीच विरले. सोंगणीचा खर्च निघणे कठीण असल्यामुळे शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरविला. काही शेतकऱ्यांनी पिकात गुरे सोडली असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीनचे पावसाअभावी तेल निघाल्यामुळे शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जि.प. अध्यक्ष नितीण गोंडाणे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही कैफियत मांडली. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून शासन, प्रशासनाला निवेदन सादर होत आहे.जिल्ह्याचे वास्तव जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाला कळविण्यात आले असतानाही शासनस्तरावर बाधित सोयाबीनचे सर्वेक्षण व भरपाईसाठी कुठलीही हालचाल नसल्यामुळे ‘हेच का अच्छे दिन?’, असा सवाल शेतकरी करीत आहेत.४० दिवस डॉट, महसूल विभाग ढिम्मयंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी आहे. याचा थेट असर खरिपाच्या पिकांवर झाला. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या सुधारित निकषानुसार जिल्ह्यात अनिवार्य निर्देशांकानुसार पर्जन्यमानासी निगडित निर्देशांक लागू व्हायला पाहिजे. किंबहुना जिल्हा दुष्काळ व्यवस्तापन समितीने याविषयीचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवायला पाठविणे अपेक्षित आहे. पावसात असलेल्या खंडाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा महसूल विभाग ढिम्म असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.दुष्काळाचे सावट; विम्याची भरपाई हवीजिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत सद्यस्थितीत २६ टक्के पाऊस कमी झालेला आहे. पावासाचा ४० दिवसांचा खंड असल्यामुळे दुष्काळाचे सावटाखाली खरीप हंगाम आहे. किंबहुना दुष्काळाचा पा४ला ट्रिगर लागू व्हायला पाा४जे व याच संदर्भाने ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविला, त्या सर्व शेतकºयांना सोयाबीन, मूग, उडीद पिकांसाठी पीक विम्याची भरपाई मिळायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.पावसाने सोयाबीनला दिलासा नाहीचजिल्ह्यात शुक्रवारपासून हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली असली तरी याचा खरा फायदा तूर व कपाशीला होणार आहे. सोयाबीन पीक फुलोरावर असताना व शेंगा भरत असताना पावसाची नितांत आवश्यकता असते. मात्र, या दोन्ही स्टेजमध्ये जिल्ह्यात पावसाचा खंड असल्यामुळे थोड्या फार प्रमाणात याचा लाभ होणार आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात भारनियमनामुळे पुरेसे सिंचन होऊ शकत नसल्यानेही सरासरी उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.हे निकष महत्त्वाचेजिल्ह्यात जून ते २१ सप्टेंबरपर्यंत १३ तालुक्यांत पावसाची तूट आहे. यामुळे उपलब्ध भूजलात कमी आहे. जिल्ह्याचा दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता निदेशांक, खरिपाच्या पिकांची एकंदर स्थिती पाहता, जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा समितीने गांभीर्य दाखवून या निकष व निर्देशांकाच्या आधारे जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.सोयाबीनच्या सर्वेक्षणासंदर्भात शासनाकडून अद्याप निर्देश नाहीत. मात्र, जिल्हा प्रशासनाला ज्या तक्रारी व निवेदन प्राप्त आहेत, त्यासंदर्भात शासनाला संपूर्ण माहिती पाठविण्यात आलेली आहे.- के.पी.परदेशीअप्पर जिल्हाधिकारीशासनस्तरावरून यासंदर्भात सूचना प्राप्त नाहीत. मात्र, सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे याचा सोयाबीनला फायदा होणार आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात पावसाची तूट अधिक असल्याची वस्तुस्थिती आहे.- सुभाष नागरेकृषी सहसंचालक