शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे अनुदान : ८ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत केव्हा? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:32 IST

गतवर्षी बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २०० रूपये दराने २५ क्विंटलप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. या मदतीसाठी पात्र जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे १२ कोटी १६ लाखांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही.

अमरावती : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २०० रूपये दराने २५ क्विंटलप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. या मदतीसाठी पात्र जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे १२ कोटी १६ लाखांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.सोयाबीनची मदत मिळविण्यासाठी जिल्ह्यातून साधारणपणे ४५ हजार प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे बाजार समित्यांव्दारा सादर करण्यात आले. या प्रस्तावांची तालुकास्तरीय समितीव्दारा पडताळणी करण्यात आली. जिल्ह्यात अमरावती व धामणगाव बाजार समितीमध्ये प्रस्तावांची संख्या अधिक असल्यामुळे पडताळणी रखडली होती. मात्र, आता जिल्हा उपनिबंधकांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन पणन् संचालकांकडे अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे. शासनाने कांद्याचे अनुदान मागील आठवड्यात दिल्याने या आठवड्यात सोयाबीनचे अनुदान मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र शासनाला या अनुदानाचा विसर पडला आहे. असे आहे तालुकानिहाय प्रलंबित अनुदानअमरावती तालुक्यात २३,१५८ शेतकऱ्यांचे सात कोटी ६५ लाख, नांदगाव २,४५४ शेतकऱ्यांचे ६३ लाख ५५ हजार, चांदूररेल्वे १,३०३ शेतकऱ्यांचे ३२ लाख २० हजार, धामणगाव ३,३०३ शेतकऱ्यांचे एक कोटी दोन लाख, तिवसा २७३ शेतकऱ्यांचे सहा लाख ७६ हजार, चांदूरबाजार १,६७० शेतकऱ्यांचे ४५ लाख ४७ हजार, मोर्शी १,२४५ शेतकºयांचे २८ लाख ४९ हजार, वरूड ३७ शेतकऱ्यांचे ४० लाख २१ हजार, अंजनगाव सुर्जी १,७६५ शेतकऱ्यांचे ५० लाख १४ हजार, अचलपूर १,६४८ शेतकऱ्यांचे ५५ लाख ९८ हजार धारणी ५६३ शेतकऱ्यांचे २४ लाख ९२ हजार रूपयांचे अनुदान प्रलंबित आहे. रोशनखेडयातील  त्या शेतकऱ्यांनाही अनुदानवरूड तालुक्यातील रोशनखेड्यातील शेतकरी कृषी बाजार संस्थेला पणन अनुज्ञप्ती प्राप्त आहे. या केंद्रावर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने सोयाबीन विकले गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांनादेखील प्रतिक्विंटल २०० रूपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने मंगळवार ८ आॅगस्ट रोजी घेतला आहे.