शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिवारात पेरण्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:12 AM

मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : उशिरा पावसामुळे मूग, उडीद कमी, सोयाबीनची क्षेत्रवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे. सद्यस्थितीत दोन लाख हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही टक्केवारी २७ आहे. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे.मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पिकांत फेरपालट होत असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र सध्या स्थिर राहणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये मुगाचे ३३ हजार हेक्टर व उडिदाचे ३० हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या वा तिसºया आठवड्यापर्यंत मूग, उडिदाची पेरणी केली जाते. यामुळे ६० दिवसाच्या अल्प कालावधीतील मूग व उडदाची पिकांचे क्षेत्र कमी होऊन ते सोयाबीनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठाने सांगीतले.जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, तर कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. तूर्तास हेच क्षेत्र कायम राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीयंदाच्या हंगामासाठी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी २.३१ लाख हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. कपाशी ५८ हजार ९१८, धान २ हजार ३८४, ज्वारी ४ हजार ५४९, मका ४ हजार ४०२, तूर ३२ हजार ४३४, मूग ३ हजार ५१५, उडीद ९९५, भुईमूग १६२ व इतर पिकांचे ५०२ हेक्टर क्षेत्र आहे.जिल्ह्यात सरासरी १५४ मिमी पाऊसजिल्ह्यात गुरुवारपर्यंत १३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना १५४ मिमी पाऊस पडला. ही ११३ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ९०.२ मिमी पाऊस झाला. सद्यस्थितीत अमरावती १३७, भातकुली १३०, नांदगाव खंडेश्वर २१७, चांदूर रेल्वे १८८, धामणगाव रेल्वे १४१, तिवसा १०५, मोर्शी १३१, वरूड १२६, अचलपूर २१८, चांदूर बाजार १४८, दर्यापूर १५७, अंजनगाव सुर्जी १५८, धारणी १०५ व चिखलदरा तालुक्यात १९० मिमी पाऊस पडला. हा पाऊस पेरणीयोग्य असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस