-तर सोमवंशीना मिळणार पोलीस संरक्षण
By Admin | Updated: April 26, 2015 00:27 IST2015-04-26T00:27:28+5:302015-04-26T00:27:28+5:30
पोलिसांना नाशिक विद्यापीठाकडून पत्र मिळाल्यास माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार सांभाळण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल.

-तर सोमवंशीना मिळणार पोलीस संरक्षण
डीन प्रकरण : नाशिक विद्यापीठाला पत्र पाठविणार
अमरावती : पोलिसांना नाशिक विद्यापीठाकडून पत्र मिळाल्यास माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार सांभाळण्यासाठी पोलीस संरक्षण दिले जाईल. मागील काही दिवसांंपासून पीडीएमसीतील अधिष्ठातापदाचे रुजू नाट्य सुरु आहे. याबाबत सोमवंशी आता पोलीस सरंक्षणासाठी विद्यापीठाकडे दाद मागणार आहेत.
सात वर्षांपूर्वी पीडीएमसीचे अधिष्ठाता पद सांभाळणाऱ्या सोमवंशींवर सद्यस्थितीत पोलिसांची मदत घेण्याची वेळ आली आहे. यापूर्वी अनेकदा सोमवंशी पीडीएमसीमध्ये पदभार सांभाळण्यासाठी गेले. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेची परवानगी नसल्याने अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी त्यांची अडवणूक केली. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रारही दाखल केली. मात्र, हा संस्थेचा अंतर्गत वाद असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. दरम्यान, पोलीस उपायुक्तांनी दोन्ही अधिष्ठात्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली.