...‘तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही’ म्हणत लैंगिक शोषण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 15:47 IST2023-05-28T15:46:40+5:302023-05-28T15:47:23+5:30

पीडित १५ वर्षीय मुलगी व शुभमची एका लग्नात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर त्यांच्यात संवाद वाढला.

'So you will not be allowed to be anyone's sexual abuse in amravati | ...‘तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही’ म्हणत लैंगिक शोषण!

...‘तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही’ म्हणत लैंगिक शोषण!

अमरावती : ‘तू माझी नाही तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही, माझ्याशी लग्न कर, अशी गर्भित धमकी देत एका अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली. ती चार महिन्यांची गर्भवती आहे. ही धक्कादायक घटना मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ मे रोजी उघडकीस आली. शुभम शिवदास मोकासे (२२, रा. कावली, धामणगाव रेल्वे) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली.

तक्रारीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी व शुभमची एका लग्नात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर त्यांच्यात संवाद वाढला. त्यातून त्यांचे प्रेमसूत जुळले. दरम्यान, गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील एका सायंकाळच्या वेळी पीडित मुलगी ही घरी एकटी होती. त्यावेळी शुभमने तिला घरामागे बोलाविले. ‘तू माझी नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही, माझ्याशी लग्न कर, अशी धमकी देत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. वाच्यता केल्यास तिला जीवाने मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे तिने कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपीने दोन तीन वेळा तिचे शोषण केले. पिडित मुलगी ही दहावीची विदयार्थीनी आहे.

असा आला प्रकार उघडकीस

दरम्यान,२४ मे रोजी पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने कुटुंबीयांनी तिला यवतमाळ येथील रुग्णालयात नेले. यावेळी सोनोग्रॉफीमध्ये ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. ती बाब डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितली. तो धक्कादायक प्रकार कळताच कुटुंबियांनी तिची विचारपूस केली. यावेळी तिने संपुर्ण घटनाक्रम कुटुंबियांकडे कथन केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने मंगरूळ दस्तगीर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शुभमविरुद्ध बलात्कार, धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: 'So you will not be allowed to be anyone's sexual abuse in amravati