शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटावर धुक्याची मलमली चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. चिखलदरा आणि माखला समकक्ष उंचीवर असल्यामुळे तेथील वातावरण व तापमानात साम्य आढळून येत आहे. धारणी, कोलकास व सेमाडोहचे रात्रीचे तापमान १३ डिग्री सेल्सीअसपर्यंत आले आहे.

ठळक मुद्देथंडी वाढली : रात्रीचे तापमान ११ डिग्री सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दोन दिवसांपासून मेळघाटात थंडीचा जोर वाढला आहे. चिखलदरा, घटांग, माखल्यासह ठिकठिकाणी धुक्याची मलमली चादर सर्वत्र बघायला मिळत आहे. यात पाऊसही अधूनमधून आपली हजेरी लावत आहे. मेळघाटची वनराई या दाट धुक्यात हरवली आहे.पर्यटकांना १५ डिसेंबरला या दाट धुक्यातून मार्गस्थ व्हावे लागले. त्यांना आपल्या वाहनांचे दिवे लावावे लागले. काहींनी या धुक्याचा आनंद घेतला, तर काहींना या धुक्यात मार्गस्थ होताना संघर्ष करावा लागला. भरदिवसा अधूनमधून पसरणारे हे धुके मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत अधिक दाट होत असून, सकाळी उशिरापर्यंतही ते कायम राहत आहे.मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. चिखलदरा आणि माखला समकक्ष उंचीवर असल्यामुळे तेथील वातावरण व तापमानात साम्य आढळून येत आहे. धारणी, कोलकास व सेमाडोहचे रात्रीचे तापमान १३ डिग्री सेल्सीअसपर्यंत आले आहे.कुकरूपरतवाडा-धारणी मार्गावरील घटांगपासून अवघ्या सहा मैल अंतरावर असलेल्या कुकरू येथे रात्रीचे तापमान ९ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात येते. चिखलदरा आणि कुकरू हे समकक्ष उंचीवर आहे. चिखलदऱ्याप्रमाणेच कुकरू येथे कॉफीची बाग बघायला मिळते. कुकरूच्या या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.शीतलहरघटलेल्या या तापमानावर मेळघाटात सर्वत्र थंडगार वारे वाहत आहेत. जेव्हा जेव्हा देशात शीतलहर चालते तेव्हा तेव्हा त्या कडाक्याच्या थंडीत चिखलदरा, कोलकासचे तापमान ४ ते ५ अंश सेल्सीअसपर्यंत आले आहे. कुकरूचे तापमान ३ अंश सेल्सीअसने उतरले आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग