शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त नागरिकांचे मोबाईल होणार 'कनेक्ट'

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अ‍ॅप्सचा अंगीकार करुन

अमरावती : महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अ‍ॅप्सचा अंगीकार करुन महानगरातील साडेआठ लाख नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून 'कनेक्ट' केले जाणार आहेत.
प्रत्येकवेळी महापालिकेत येऊन समस्या, तक्रार देणे हे काही सर्वांना संयुक्तीक नाही. त्यामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यात क्षणात सुसंवाद साधता यावा, याकरिता ‘स्मार्ट सिटी’ला साजेसा असा नवा उपक्रम आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. यात आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन, अपघात, स्वच्छता, मार्गदर्शन, पर्यटन, अ‍ॅम्बुलन्स सेवा, सर्प मित्र, वैयक्तिक सुरक्षा, रस्त्याचे अंतर, मार्गाचे नाव आदी नागरिकांशी संबंधित सेवेला प्राधान्या दिले जाणार आहे.
या नव्या प्रयोगाने मेट्रोपॉलिटन शहरात मिळणाऱ्या सुविधा अमरावतीत मिळणे सुकर होईल. विकासकामे करताना काही भागात नागरिकांच्या आवश्यकतेनुसार ती कामे करावी, अशा सूचना करण्याचे या अ‍ॅप्समध्ये अंतर्भूत राहणार आहेत. परिणामी एखाद्या भागात रस्ता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे, हे मोबाईलद्वारेच मार्गदर्शनातून आयुक्तांना क्षणात कळविण्याची या उपक्रमात व्यवस्था राहणार आहे. थेट महापालिकेत येऊन तक्रार करण्याची आता भानगड राहणार नसून नागरिकांकडे असलेल्या मोबाईलमधूनच एका क्लिकने तक्रार देता येणार आहे.
नागरिकांना या सुविधांचा कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. ही प्रणाली वर्धा येथील लॉजिक सिस्टिम प्रा. लि. ने तयार केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतही विकसित करण्यात आली आहे.
विशेषत: शहरातील पर्यटनक्षेत्र आणि प्राचीन मंदिरांची माहिती दर्शविणारे जागोजागी फलक लावले जाणार आहे. हे फलक लावताना त्या स्थळांचे कि.मी. दर्शविणारे अंतर शहराच्या ठिकठिकाणी राहणार आहेत. रस्ता, मार्ग ठळकपणे नमूद केले जाणार असून पर्यटकांना काहीच विचारण्याची गरज राहणार नाही, अशी सुविधा ‘स्मार्ट सिटी’ या उपक्रमात राहणार आहे.