तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात स्कीलवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:56 IST2018-02-11T22:56:08+5:302018-02-11T22:56:42+5:30
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर देशभरात प्रयत्न सुरू असून, विशेषत्वाने त्यात कौशल्य वाढविणाऱ्या अभ्यासक्रमांच्या समावेशावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू विलास सपकाळ यांनी केले.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात स्कीलवर भर
आॅनलाईन लोकमत
अमरावती : तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर देशभरात प्रयत्न सुरू असून, विशेषत्वाने त्यात कौशल्य वाढविणाऱ्या अभ्यासक्रमांच्या समावेशावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू विलास सपकाळ यांनी केले.
विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विलास सपकाळ यांनी अध्यक्षीय विवेचन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी जनागम्यानंद, व्ही. मोहनकुमार, प्राचार्य डी.जी. वाकडे, संयोजक तथा एल.एल.एल.चे संचालक श्रीकांत पाटील उपस्थित होते.
विलास सपकाळ पुढे म्हणाले, संसाधनाचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी प्रत्येकामध्ये कौशल्याची गरज आहे. कौशल्यामुळे जीवनात यशस्वी होण्यास मदत होते. माणसाला एक विशिष्ट ओळख प्राप्त होते. परिषदेच्या माध्यमातून त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विभास त्यांनी व्यक्त केला.
व्ही. मोहनकुमार यांनी उपस्थितांना ‘आम्ही सर्व जण आमच्या जीवनात आजीवन अध्ययन, मूल्यशिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देऊ. त्यामुळे सर्वांचे जीवन उंचावण्यास मदत होईल’ अशी प्रतिज्ञा दिली. यावेळी स्वामी जनागम्यानंद यांनी भाष्य केले.
कार्यशाळेचे संचालन ज्ञानेश्वर घडकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य एस.व्ही. आगरकर यांनी केले. शिक्षण विभागाचे प्रमुख जी. एल. गुल्हाने, संगणक विभागाचे सुशील काळमेघ, संगीता बिहाडे यांनी परिषदेत शोधनिबंध सादर केल्याबद्दल त्यांचा पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी वºहाडपांडे व गोरखनाथ कांबळे यांनी मनोगतातून भावना व्यक्त केल्यात.
द्विदिवसीय परिषदेला देशभरातील अनेक संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.