कौशल्य विकास ही चळवळ व्हावी
By Admin | Updated: May 24, 2016 00:41 IST2016-05-24T00:41:14+5:302016-05-24T00:41:14+5:30
देशात तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला, शहरीकरण वाढले. आपल्या देशाने मोठी प्रगती केली.

कौशल्य विकास ही चळवळ व्हावी
रणजित पाटील : विद्यापीठात मानवी संसाधन निर्मितीवर कार्यशाळा
अमरावती : देशात तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला, शहरीकरण वाढले. आपल्या देशाने मोठी प्रगती केली. परंतु कौशल्यपूर्ण मानवी संसाधने पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाली नाहीत. त्यासाठी कौशल्य विकास चळवळ व्हावी, असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी केले.
विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक डॉ.के.जी. देशमुख सभागृहात ‘कौशल्यपूर्ण मानवी संसाधने निर्माण करण्यासाठी विद्यापीठाची भूमिका’ या विषयावर आयोेजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू विलास सपकाळ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खा. आनंदराव अडसूळ, नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर अनिल सोले, एमएसएमईचे नागपूरचे संचालक पी.एम.पार्लेवार, एमजीआरआयचे वर्धा येथील संचालक पी.व्ही.काळे, एफआयएव्हीचे अध्यक्ष किरण पातुरकर, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक आर.एस.सपकाळ, उपसंचालक महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. रणजित पाटील म्हणाले, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सूत्र आज नेमके उलट झाले आहे. नोकरी मिळावी, यासाठी शिक्षण घेतले जाते. पालक पोटाला चिमटा देऊन पाल्यांना शिकवितात. त्यामुळे त्याला रोजगार मिळावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.
समाजाला जे लागतात, ते अभ्यासक्रम सुरू करण्यावर देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांचा भर असून शिक्षण आणि कौशल्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खा. अडसूळ, कुलगुरू सपकाळ यांनी देखील यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)