राष्ट्रवादीचे मूक आंदोलन, चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST2022-04-10T05:00:00+5:302022-04-10T05:00:52+5:30
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महिला विंगच्यावतीने जिजाऊ पुतळा परिसरात मूक आंदोलन व काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

राष्ट्रवादीचे मूक आंदोलन, चक्काजाम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मूक आंदोलन केले, तर ग्रामीण राष्ट्रवादीने टायर जाळले आणि चक्काजाम करून घटनेचा निषेध नोंदविला.
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले तसेच पंचवटी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महिला विंगच्यावतीने जिजाऊ पुतळा परिसरात मूक आंदोलन व काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी सुरेखा ठाकरे, सुषमा भैरवे, संगीता ठाकरे, कल्पना बुरंगे, मंगला भांबूरकर, मनाली तायडे उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेली ५० वर्षे एसटी कर्मचाऱ्यांचे हित जोपासत त्यांचे प्रश्न सोडविले. सद्यस्थितीतील राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी सरकारसोबत चार ते पाच वेळा चर्चा केली. मात्र, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना अवाजवी आश्वासने दाखवून विध्वंसक वृत्तीच्या सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना चिघळविल्या. या कारस्थानामागे काही मास्टर माईंड असून, त्यांना शोधून काढण्याचा निर्धार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी मूक आंदोलनातून खबरदारीचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या विध्वंसक आंदोलनाचा निषेध केला. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, डॉ. गणेश खारकर, प्रदीप राऊत, प्रा. प्रफुल राऊत, अरुण पाटील गावंडे, प्रकाशनाना बोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश शर्मा, गुड्डू धर्माळे, सुशील गावंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वणवे, माजी महापौर ॲड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, वहीद खान, अनिल ठाकरे, अजीज पटेल, ॲड. सुनील बोळे, अशोक हजारे, दिनेश देशमुख, गजानन बरडे, दीपक कोरपे, माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम, विजय बाभूळकर, भूषण बन्सोड, श्रीकांत झंवर, नीलिमा काळे, संजय बोबडे, नितीन भेटाळू, संजय मळणकर, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे आदी उपस्थित होते.