शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांचा सल्ला ठरणार महत्त्वाचा पुरावा

By admin | Updated: February 28, 2016 00:32 IST

निकिता सवई मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालानंतर निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदनावरून स्पष्ट झाले.

पोलीस आयुक्तांची घटनास्थळाला भेट : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने निकिताचा मृत्यू अमरावती : निकिता सवई मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालानंतर निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने झाल्याचे शवविच्छेदनावरून स्पष्ट झाले. मात्र, विद्युत प्रवाहाचा झटका तिच्याच चुकीमुळे लागला की, तिची हत्या करण्याच्या उद्देशाने देण्यात आला, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस विभागाने शासकीय इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्याचा सल्ला घेतला असून तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल, अशी माहिती शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर 'लोकमत'शी संवाद साधताना दिली. याप्रकरणाचे तपासकार्य लवकर पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी राजापेठचे पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांना दिले. फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी मधुकर ढोले यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या निकिता सवईचा मृतदेह संशयास्पद स्थितीत तिच्या खोलीत आढळून आला. मोबाईल कॉलची घेतली जातेय माहितीअमरावती : तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तिला विद्युत प्रवाहाचा झटका लागला कसा, हा प्रश्न पोलीस तपासात अडसर निर्माण करणारा ठरला आहे. शनिवारी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन निकिताच्या खोलीची पाहणी केली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व राजापेठचे ठाणेदार एस.एस.भगत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी ठाणेदाराना योग्य ते निर्देश दिले. निकीताच्या मृत्यूपूर्वी तिला भेटण्याकरिता आलेल्या काही व्यक्तींचे पोलिसांनी बयाण नोंदविले आहेत. तसेच तिच्या मोबाईल कॉलच्या माहितीवरून तिच्याशी संपर्क करणाऱ्यांची बयाणे सुध्दा पोलिसांनी नोंदविली आहे. आतापर्यंत पोलिसांनी २० जणांचे बयाण नोंदविले असून अद्यापर्यंत घटनेचे गुढ कायमच आहे. शुक्रवारी राजापेठ पोलिसांनी एका युवकाला चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्याची चौकशीसुध्दा सुरू आहे. निकिताला विद्युत प्रवाहाचा झटका कसा बसला? याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पोलिसांनी इलेक्ट्रानिक्स अभियंताचा सल्ला घेतला आहे. तसेच परिस्थितीजन्य पुरावे आणि निकिताला भेटणारे व संवाद साधणाऱ्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस आयुक्त मंडलिक यांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)