आजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:36+5:30

समाजकल्याणमध्ये ब्रिक्स इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीकडे विविध कर्मचारी सेवा पुरविण्याचे कंत्राट शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र, १९ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयसी, पीएफची रक्कम कपात होत असताना ती त्यांच्या खात्यात जमा होत नाही. वैद्यकीय सेवा मिळत नाही. चार ते पाच कर्मचाऱ्यांना गंभीर आजार झाले.

Sick, crippled staff reached the stretcher | आजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर

आजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर

Next
ठळक मुद्देसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय : मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी अशीही शक्कल, संमिश्र प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या कार्यालयात कार्यरत काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधी, ईपीएफची रक्कम भरली नसल्याने त्यांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागले. चार ते पाच कर्मचाऱ्यांना कायम अपंगत्व आले. बुधवारी युवा सेनेने या कर्मचाºयांना स्ट्रेचरवर समाजकल्याण उपायुक्तांच्या दालनात नेल्याने गोंधळ उडाला. आंदोलनाच्या या प्रकाराबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
समाजकल्याणमध्ये ब्रिक्स इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीकडे विविध कर्मचारी सेवा पुरविण्याचे कंत्राट शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र, १९ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयसी, पीएफची रक्कम कपात होत असताना ती त्यांच्या खात्यात जमा होत नाही. वैद्यकीय सेवा मिळत नाही. चार ते पाच कर्मचाऱ्यांना गंभीर आजार झाले. काहींना कायमचे अपंगत्व आले, असे युवा सेनेने निवेदनात म्हटले आहे. अपंगत्व आलेल्या कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची समाजकल्याण अधिकाºयांनी उपचारासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी युवा सेनेने केली. आंदोलनादरम्यान पराग गुडधे, वैभव मोहोकार, बाळा सावरकर, विजय ठाकरे, प्रीती कडू, अर्चना मुदल, रेखा बागडे, नंदा अस्वार, चित्रा वानखडे हे उपस्थित होते.


कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतची जबाबदारी ही ब्रिक्स कंपनीकडे आहे. या एजन्सीला काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करावे. वेतन अदा करू नये, असे आयुक्तांना कळविले आहे. .
- विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, अमरावती.

Web Title: Sick, crippled staff reached the stretcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.