शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

चार जणांच्या उपस्थितीत होणार ‘शुभमंगल सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येईल. वाहन निर्जंतुक केलेले असणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाºया सर्वांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणार नाही. लग्न समारंभ समारंभ पार पाडताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा.

ठळक मुद्देप्रशासनाने काढले आदेश : घ्यावी लागणार परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/ चिखलदरा : कोरोना आजाराचा फैलाव पाहता, लग्न समारंभासाठी आता प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. विवाहाकरिता वर व वधू वगळता केवळ चार व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे
हिंदू रीतिरिवाजानुसार गाजावाजा करीत, लग्न समारंभ थाटात साजरा करण्याची पद्धत आहे. परंतु, कोरोनाकाळात ही पद्धत काही दिवस मोडीत काढत लग्न साध्या व घरगुती पद्धतीने करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी जाहीरपणे नागरिकांना त्याबाबत सूचित केले. शासनाच्या या आदेशाने हार-तुरे, बँड बाजा, जेवणावळी, डीजे, बुफे, फटाक्यांची आतषबाजी आदी सर्व बाबींना बंदी घालण्यात आली आहे.

या आहेत अटी
लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येईल. वाहन निर्जंतुक केलेले असणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाºया सर्वांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणार नाही. लग्न समारंभ समारंभ पार पाडताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. लग्न समारंभात उपस्थित राहणाºया सर्वांना आरोग्य सेतु अ‍ॅप वापरणे बंधनकारक राहणार आहे.

ही लागणार कागदपत्रे
लग्नपत्रिका (असल्यास), वर-वधू यांची टीसी व आधार कार्ड, ज्या चार व्यक्ती उपस्थित राहतील, त्यांची नावे व आधार कार्ड, वापरले जाणारे वाहनाचे कागदपत्र, वाहनचालकाचे नाव, आधार कार्ड व वाहनचालक परवाना तसेच सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. लग्न समारंभासाठी शासनाने दिलेल्या नियम-अटींचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.
- मदन जाधव
तहसीलदार, अचलपूर

टॅग्स :marriageलग्न