शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाकरिता वाठोडावासीयांचे श्रमदान

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.

वरूड : तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. याकरिता पाणी फाउंडेशनच्यावतीने 'वॉटर कप' स्पर्धेकरिता विदर्भातून एकमेव वरूड तालुक्याची निवड करण्यात आली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. अभिनेता आमिर खान यांनी १५ दिवसांपूर्वी वाठोडा गावाला भेट देऊन श्रमदान केले. यामुळे ेनागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आता १०० नागरीक नियमित श्रमदान करून बंधाऱ्यांची निर्मिती करीत आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याकरिता २ लाख ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी ग्रामपंचायतींकडे गोळा झाली. यातून जलसंधारणाची कामे ेकरण्यात येत आहेत. तालुक्यातील भूजल पातळी वाढविण्याकरिता श्रमदान आणि लोकसहभागातून जलसंधारणाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यजित भटकळ यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता विदर्भातून वरूड तालुक्याची निवड केली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. नियमित १०० लोकांचा सहभाग याला मिळत आहे. गावातील नागरिकांचा उत्साह पाहून अभिनेता आमिर खान, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी श्रमदान करून लोकांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानाकरिता ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी, विदर्भ पटवारी संघ, महिला बचतगट, बजरंग दल, शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी, समाजप्रबोधन मंच, जायन्टस ग्रुप, इंडियन मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघ युवा जागर, युवक मंडळ, भजनी मंडळ, व्हॉलीबॉल संघ आदी सेवाभावी संघटना पुढे सरसावल्या असून गावांमध्ये जाऊन श्रमदान करीत आहेत. आर्थिक पाठबळ असावे म्हणून जलसंधारणाच्या कामाकरिता वाठोडा ग्रामस्थांनी २ लाख रुपये लोकवर्गणी जमा केली आहे. जसंधारणाची कामे पूर्ण करून गावातील भूजल पातळी वाढविण्याकरिता अभिनेता आमिरखान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन श्रमदान निरंतर सुरू ठेवले आहे. नागरिकांंचा उत्साह पाहता नियमित १०० महिला-पुरुष श्रमदानाला जात असतात. गाडगेबाबा मंडळाने बांधले जनावरांसाठी पाणी टाके येथील गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी माहुली फाटयानजीक असलेल्या हॉटेल पारिजातजवळ मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून येथे मोठे टाके मागील अनेक वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी जंगलात गाई-म्हशी व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. हे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येथे शहानूर योजनेचे नळ कनेक्शन घऊन तो नळ टाक्यात सोडण्यात आले. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या जनावरांची तहान या पाण्यामुळे भागविली जाते. त्यामुळे यातून बरीच सोय झाली आहे.