धारणीत रात्री उशिरापर्यंत चालतात दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:20+5:302021-07-21T04:11:20+5:30

धारणी दिनांक २० जुलै धारणी शहर सध्या कोरोना विषाणूच्या अनुसंगाने पोषक वातावरण तयार करीत आहे . आठवड्याचे सर्व दिवस ...

Shops run late into the night | धारणीत रात्री उशिरापर्यंत चालतात दुकाने

धारणीत रात्री उशिरापर्यंत चालतात दुकाने

धारणी दिनांक २० जुलै

धारणी शहर सध्या कोरोना विषाणूच्या अनुसंगाने पोषक वातावरण तयार करीत आहे . आठवड्याचे सर्व दिवस एकसमान करून वीकेण्डला फटका देत दररोज रात्री उशिरापर्यंत शहरातील दुकाने उघडी असतात . विशेष म्हणजे या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनासह पोलीस आणि नगरपंचायतद्वारे धृतराष्ट्राची भूमिका वठविण्यात येत असल्यामुळे सर्वांनी कोरोनासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे ठरविले आहे की काय असा सवाल धारणी येथील सूज्ञ नागरिक करीत आहेत .

धारणी शहराला मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे . धारणी येथे उपविभागीय स्तरावरील जवळपास सर्व शासकीय कार्यालये आहेत . त्यामुळे कार्यालयीन कामासोबतच बँकेतील व्यवहार आणि दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आजूबाजूच्या जवळपास 170 गावांसह मध्यप्रदेशातील गावातील नागरिकसुद्धा शहरात दाखल होतात . धारणी शहरातील बाजारपेठ त्यामुळे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहत असल्यामुळे शासनाने जारी केलेल्या दुपारी ४ नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश धारणी शहरात लागू नसल्याची जाणीव निर्माण होते . कारण दिवसभर आणि जवळपास रात्री आठ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश दुकाने राजरोसपणे उघडी असतात आणि लोकांची देवाण-घेवाण सुरू असते .

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहण्याची सूचना जारी करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे विकेंडला शनिवार आणि रविवारी फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे . मात्र धारणी शहरातील सर्व दुकाने कोणत्याही प्रकारचे नियम व अटींचे पालन न करता दिवसभर सुरू राहत असल्याचे चित्र पहावयास मिळते . त्यामुळे धारणी शहर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारीत असल्याचे चित्र आहे . एकीकडे प्रशासन कोरोना ची तिसरी लाट येऊ नये आणि आल्यात तर त्याविरुद्ध युद्धस्तरावर तरी तयारी करीत असताना शहरातील अमर्याद गर्दीमुळे प्रशासनासमोर भविष्यात फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे .

याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याशी या विषयावर बोलले असता त्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना दुकाने वेळेवर बंद करण्याची सूचना दिली असून गैरप्रकार होत असल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले .

Web Title: Shops run late into the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.