शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

दुकाने बंद; नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्याकरिता शासन प्रयत्नशील असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत.

ठळक मुद्देसंचारबंदीला आव्हानच : नगर पालिकेसह पोलिसांचेही अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी जिल्हाभर जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहेत. परंतु मोर्शी शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्याकरिता शासन प्रयत्नशील असून कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता आठवड्यातील प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत. जेणेकरून नागरिक घरातच राहील व कोरोनाची साखळी खंडित होईल, अशा मार्गदर्शक सूचनासुद्धा प्रशासन व शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येत आहेत. परंतु मोर्शी शहरात शनिवारी व रविवारी सर्व प्रकारची प्रतिष्ठाने बंद असली तरी काही हॉटेल, चहा विक्रेते आपली दुकाने सकाळच्या सत्रात सुरू ठेवतात. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. त्याचबरोबर दिवसभर नागरिक या-ना त्या कारणाने शहरातील मुख्य रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. शहरातील मुख्य चौक असलेला सिंभोरा व जयस्तंभ चौकात जनता कर्फ्यूच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. नागरिकसुद्धा या दोन्ही दिवशी गप्पागोष्टी करण्यासाठी या चौकात गर्दी करीत असल्याचे दिसून येते. मोर्शी शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्यासुद्धा दोन अंकी आकडा पार करून जात असल्याने नागरिकांनी उपायोजना म्हणून घरी राहणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्यावरसुद्धा मोर्शी शहरातील काही नागरिक हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे. पर्यायाने मोर्शी शहरात जनता कर्फ्यूच्या दिवशी नागरिकांची शहरात मोठी गर्दी दिसत आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाच्यावतीने वचक बसविणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या