शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

एम.कॉम.प्रथम वर्षाला मराठीऐवजी इंग्रजीत पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 5:55 PM

अमरावती विद्यापीठाचा प्रताप : पेपर न सोडविता विद्यार्थ्यांची विद्यापीठात धाव

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत एम.कॉम. प्रथम वर्षाचा द्वितीय सेमिस्टर 'व्यवसायिक संगणक' या विषयाचा पेपर चक्क मराठीऐवजी इंग्रजीत देण्यात आल्याचा धक्कदायक प्रकार बुधवारी निदर्शनास आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर न सोडविता विद्यापीठ गाठले. मात्र, येथे त्वरेने कोणताही तोडगा निघाला नाही. आता हा विषय केंद्रीय मूल्यांकन समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेत एम.कॉम. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टरचा व्यवसायिक संगणक विषयाचा पेपर बुधवारी सकाळी ९ ते १२ या कालावधीत होता. एम.कॉम. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नपत्रिका देण्यात आल्यात. त्यामुळे एकूणच विद्यार्थी गोंधळून गेले. मराठी भाषेचे विद्यार्थी इंग्रजीचा कसा पेपर सोडविणार, असा सवाल परीक्षार्थ्यांनी केला. मात्र, केंद्रावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर विद्याभारती महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, विमलाबाई देशमुख महाविद्यालय आणि तक्षशीला महाविद्यालयातील विद्यार्थी एकवटले. विद्यापीठ गाठून त्यांनी परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्यासमोर आपबिती कथन केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नान्वये सिलॅबसनुसार एम.कॉम. प्रथम वर्षाचा व्यवसायिक संगणक विषयाचा पेपर देण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांनी त्यांच्या (मराठी, हिंदी अथवा इंग्रजी) भाषेत सोडविणे अपेक्षित आहे, असे हेमंत देशमुख यांनी सन २०१६ पासून बदल झालेल्या सिलॅबसची प्रत विद्यार्थ्यांना दाखविली.

सिलॅबसमध्ये झालेल्या बदलाची माहिती संबंधित विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे, असेदेखील परीक्षा संचालक देशमुख म्हणाले. मात्र, या क्षणी विद्यापीठ कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना मराठीऐवजी इंग्रजी भाषेत देण्यात आलेल्या पेपरसंदर्भात केंद्रीय मूल्यांकन समितीची बैठक २० मे रोजी घेण्याबाबत निर्णय झाला. परंतु, चूक कुणाचीही असली तरी आजमितीला विद्यार्थीच भरडला जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. यावेळी अर्जुन अंभोरे, अक्षय वाघमारे, रोहित गजभिये, मनीषा तांबडे, भावना मासोदकर, बुद्धिमान बनसोड, मोहिनी कंगाले आदी विद्यार्थी उपस्थित होते.

नव्या सिलॅबसप्रमाणे पेपर इंग्रजीत असला तरी परीक्षार्थ्यांना त्यांच्याच भाषेत सोडवायचा होता. एम.कॉम. प्रथम वर्ष व्यवसायिक संगणक विषयाबाबत हा वाद आहे. आता यासंदर्भात २० मे रोजी केंद्रीय मूल्यांकन समितीची बैठक होणार असून, हीच समिती अंतिम निर्णय घेईल.  - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ. मराठी भाषेचा पेपर न देता तो इंग्रजीत होता. त्यामुळे परीक्षा केंद्रावर स्वाक्षरी करून बाहेर पडलो. एम.कॉम. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टरचा व्यवसायीक संगणक विषयासाठी हा प्रकार सर्वत्र अशाच घडला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी मराठी भाषेच्या पेपरची मागणी केली आहे. यापूर्वी मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका देण्यात आल्यात.   - अर्जुन अंभोरे   विद्यार्थी, श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा