शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फरार नीरव मोदी याची संपत्ती अमरावतीत

By गणेश वासनिक | Updated: April 30, 2024 11:53 IST

Amravati : पीएनबी बँकेकडून जप्तीची नोटीस; २५०० चौ. मी. जमीन घेणार ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १४ हजार कोटींचा बँक घोटाळा करून भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी याची संपत्ती अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने २५०० चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यासाठी २ एप्रिल २०२४ रोजी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे नीरव मोदीचे अमरावती कनेक्शन शोधून काढणे सरकारपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

पीएनबी बैंक घोटाळा हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. तो घोटाळा करून पाच वर्षांपासून फरार झाला होता. नीरव मोदीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, पीएनबी बँकेला मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगीला ईडी हायकोर्टाने आव्हान दिले होते. मात्र, जनतेचा पैसा असल्यामुळे नीरव मोदीविरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला ४२४ कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याची विशेष परवानगी न्यायालयाने बँकेला दिली होती. तसेच ४८ मालमत्तांपैकी ४७ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्या अनुषंगाने २०१९ पासून पंजाब नॅशनल बँकेने १४ हजार कोटींच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीचे सर्चिग सुरू केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात जमीन जप्तीसाठी पीएनबीने नोटीस जारी केली आहे.

मोदीवर ८ लाख ६२ हजार ९५१ रुपयांची थकबाकीअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील सर्व्हे क्रमांक ३१३ मध्ये २५०० चौरस मीटर जमीन फरार आरोपी नीरव मोदी याच्या नावे असल्याची नोंद आहे. या जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेकडून ३० जून २०१८ रोजी कर्ज घेतल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. १४.३० टक्के दराने व्याजासह ८ लाख ६२ हजार ९५१ रुपयांची थकबाकी दर्शविण्यात आली आहे. मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी आशु कुमार यांच्या स्वाक्षरीने नीरव डी. मोदी, ग्रोसवेनोर हाऊस, दुसरा माळा, पेडर रोड, मुंबई याच्या नावे असलेली २५०० चौ. मी. जमीन जप्त करण्याची नोटीस जारी केली आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीAmravatiअमरावती