धक्कादायक! मद्यपी आई अंगावर झोपल्याने बाळ दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 19:19 IST2018-08-26T19:19:04+5:302018-08-26T19:19:18+5:30
मद्यधुंद अवस्थेत असलेली आई अंगावर झोपल्याने दोन महिन्यांचे बाळ दगावल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी चांदूर बाजारात उघडकीस आली.

धक्कादायक! मद्यपी आई अंगावर झोपल्याने बाळ दगावले
अमरावती : मद्यधुंद अवस्थेत असलेली आई अंगावर झोपल्याने दोन महिन्यांचे बाळ दगावल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी चांदूर बाजारात उघडकीस आली. रुमिता फुकराज भोसले (३०, रा. खैरी दोनोडा, ता. अचलपूर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
चांदूर बाजार येथील मुख्य रस्त्यावर आरोपी रुमिता भोसले बाळाच्या अंगावर झोपलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिच्या बाळाची तपासणी केली असता ते मृत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बाळाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. मद्यधुंद अवस्थेत बाळाला व्यवस्थित न सांभाळता महिला हलगर्जी व निष्काळजीपणाने बाळाच्या अंगावर झोपल्याचे निदर्शनास आले. या घटनेची तक्रार पोलीस शिपाई विनोद इंगळे यांनी चांदूरबाजार पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रुमिता भोसलेविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदविला.