कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:27 PM2017-12-20T22:27:29+5:302017-12-20T22:28:35+5:30

लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले.

'She' waiting for justice to suffer the loss of her family | कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देअमरावतीत माहेर : सुखवस्तू कुटुंबातील, तरीही रेल्वे स्टेशनच्या आडोशाला आश्रय

इंदल चव्हाण ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले. त्यामुळे माहेरी आल्यावर रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात आश्रय घेण्याची वेळ एका वृद्धेवर येऊन ठेपली आहे. आपले प्रकरण न्यायदरबारी मांडण्यासाठी सुहृद व्यक्तीने पुढे यावे, अशी तिची अपेक्षा आहे.
सदर वृद्धा आपले नाव आशाबाई भवलाल बडगुजर असल्याचे सांगते. तिचे अंदाजे वय ५५ वर्षांच्या आरपास आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक मार्गातील काही घरे ही तिच्या भावांच्या मालकीची होती. प्रभाकर सदावर्ते, दिवाकर सदावर्ते, नारायण पहिलवान अशी नावे तिच्या बोलण्यातून पुढे आली. ते कंत्राटदार होते आणि सुखवस्तू होते. या कुटुंबातील ती एकमेव वारस असल्याचे वृद्धेने सांगितले.
दरम्यान, आशाबाईचे लग्न खंडवा येथे झाले. तेथेही बडगुजर कुटुंब सुखवस्तू होते. त्यांना दोन मुले व दोन मुलगी होत्या. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाले. दोन्ही मुलं नोकरी मिळविण्याच्या बेतात पैसे घेऊन घराबाहेर पडले नि त्यांचा अपघात होऊन ते दगावले. संपत्तीच्या हव्यासापोटी गावातील काही व्यक्तींनी लुटमारीचा बनाव करीत राखीला आलेली मुलगी व तिच्या मुलांचा खून घडवून आणला. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यानंतर काही वर्षे परागंदा राहिलेल्या आशाबार्इंनी अमरावती शहर गाठले.
दरम्यानच्या काळात भावांची जुनी घरेही इतरांनी बळकावली होती. त्यामुळे आपली व्यथा मांडत त्यांनी या घरापुढील अमरावती रेल्वे स्थानक गाठले आणि तेथे १५ दिवसांपासून बस्तान मांडले. माहेर दुरावलेले, पती-मुलांचा वियोग आणि विचित्र दैवयोगाने झालेली विपरीत परिस्थिती याचा ताण पडल्याचे त्यांच्या स्थितीवरून जाणवते. तरीही आपली व्यथा कायद्याचे ज्ञान व सामाजिक भान असलेला कुणी तरी ऐकेल व न्याय मिळवून देईल, अशी आशा त्यांना आहे. ही भाबडी आशा ठरू नये, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
रस्त्यावरचे जिणे अन् अनंत वेदना
आशाबार्इंना परिस्थितीने रस्त्यावरचे जिणे आणले आहे. गेल्या १५ दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर ती या अवस्थेत आढळून येत आहे. या काळात अमरावती येथील एकाही नातेवाईकाने त्यांच्याशी संपर्क करण्याची वा त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.

Web Title: 'She' waiting for justice to suffer the loss of her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.