शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून ती राहिली गर्भवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्यासाठी ३० हजार रुपयेदेखील त्याने पीडिताच्या भावाकडून ऑनलाईन घेतले. त्यानंतर प्रेमसंबंध गहिरे झाले व ते एकाच खोलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोशल मीडियावर झालेली ओळख, घट्ट मैत्री, त्यातून लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाचे आमिष, बळजबरी व त्यातून पोटी अंकुरलेला त्याचा गर्भ. ओळखीपासून सुरू झालेला हा प्रेमाचा ‘डेली एपिसोड’ अखेर त्याला गजाआड घेऊन गेला. त्याला कारणीभूत ठरला तो त्याने तिचा केलेला विश्वासघात! दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ‘सिलसिल्या’चे असे विश्वासघातकी ‘ब्रेकअप’ झाले आहे. गर्भवती राहिल्यानंतरही त्याने ‘ तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतल्याने त्या तरुणीने मकरसंक्रांतीदिनी रात्री गाडगेनगर ठाणे गाठले. आपबिती सांगितली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी धीर देत तक्रार नोंदवून घेतली अन् आरोपी राहुल हरिदास कळसकर (३५, वाठोडा, ता. भातकुली) याच्याविरुद्ध कलम ३७६ (२), एन, ४२०, ५०६ ब, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला. लागलीच आरोपीला अटक करण्यात आली. २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत त्याने तिचे सर्वस्व लुटले.तक्रारीनुसार, पीडिताची आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली. ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्यासाठी ३० हजार रुपयेदेखील त्याने पीडिताच्या भावाकडून ऑनलाईन घेतले. त्यानंतर प्रेमसंबंध गहिरे झाले व ते एकाच खोलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.

...म्हणे आम्ही नवरा-बायकोअमरावती शहरात भाड्याने एका खोलीत राहत असताना त्याने आपण नवदाम्पत्य असल्याची बतावणी शेजाऱ्यांना केली. लोकांना खोटे का सांगतो आहे, अशी विचारणा करणाऱ्या पीडितेला त्याने मारहाण व शिवीगाळदेखील केली. तो तिला महाविद्यालयातदेखील जाऊ देत नव्हता. 

पीडिताच्या आईची आर्थिक फसवणूकलग्न करण्याची बतावणी करून त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध केले. त्यातून ती गर्भवती राहिली. त्याचा विश्वासघातकीपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडिताच्या आईकडून महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी ५० हजार रुपये घेतले, मात्र शुल्क भरले नाही. 

केवळ विश्वासघातआधी मदतीचा बहाणा करून त्याने आपल्याशी मैत्रीचे सूर जोडले. मग लग्नाच्या आणाभाका घेतल्या. शरीरसंबंध जोडले. त्यातून गर्भवती राहिल्यानंतर त्याचे सूरच बदलले; ती डोळ्यात प्राण आणून महिला पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होती.

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप