शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यांच्या भावात कमालीची घसरण

By admin | Updated: October 9, 2015 00:55 IST

विदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.

शासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्यात ९०० कोटींची उलाढालसंजय खासबागे वरूडविदर्भातील एकूण हेक्टरपैकी संत्रा लागवडीचे क्षेत्र अमरावती जिल्ह्यात ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. संत्रा व्यवसायातून ९०० कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. परंतु बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. सध्या आंबिया बहराची संत्री कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. दरवर्षी संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे. बहुगुणी संत्र्याला राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेण्यात येते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देश-विदेशात परिचित असलेला वरुड तालुका ंसंत्र्याकरिता प्रसिध्द आहे. तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे. या परिसरात ३५ टक्क्यांपेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातात. दरवर्षी मृग बहराचा संत्रा उत्पादन घेतला जात होता. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असून मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली आहे. आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरात कमालीची घसरण केली आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून संत्रा विकला जाण्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेची प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरीत परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळाला ८०० ते एक हजार रुपये प्रतिहजार रुपये मोजावे लागतात. मध्यन प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्च बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा उत्तर आणि दक्षिण भारतात विकला जात असून परप्रांतीय बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने संत्राच्या भावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेच सावट पसरले आहे. संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी राष्ट्रीय संत्रा परिषद घेतली होती. आता विद्यमान आ. अनिल बोंडे यांनी संत्राचे महत्त्व देशात पटवून देऊन संत्राला राजाश्रय मिळावा म्हणून राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सव आयोजित केला होता. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीसुध्दा प्रक्रिया केंद्राचे आश्वासन राष्ट्रीय संत्रा परिषदेत दिले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेदं्र फडणवीस यांनीसुध्दा मोर्शीला संत्रा रस प्रक्रिया केंद्र आणि वरुडला राज्यातून पहिला संत्रा डिहायड्रेशन (निर्जलीकरण) प्रकल्पाची घोषणा केली आहे. परंतु या घोषणा घोषणाच राहतील की, प्रत्यक्षात उतरतील, याबाबत संत्रा उत्पादक शंका उपस्थित करीत आहेत.